Ayurvedic Tips : पीसीओएसच्या त्रासाने त्रस्त आहात ? मासिक पाळी येताना त्रास होतो? कोणत्या आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश कराल ?

पीसीओएसचा त्रास होत असेल तर काय कराल?
Pcos problem, Health issue, Ayurvedic tips
Pcos problem, Health issue, Ayurvedic tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : बऱ्याच महिलांना पीसीओएसच्या त्रासाने त्रस्त आहेत . पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम(पीसीओएस )हा हार्मोनल असंतुलनामुळे होणारा आजार (Disease) आहे .

हे देखील पहा -

प्रौढ स्त्रियांमध्ये हा आजार सामान्य असून याचे परिणाम गंभीर आहेत .पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित व दीर्घकाळ असू शकते .याशिवाय ही समस्या एंड्रोजन पातळी वाढवण्याचे काम करते .पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे निदान करण्यासाठी ,डॉक्टर मासिक पाळी आणि शरीरातील बदलांशी संबंधित इतर माहिती घेतात .आणि रक्त चाचणी एन्ड्रोजनची पातळी शोधते .मासिक पाळी किंवा पीसीओएसचा त्रास होत असेल तर आपण या आयुर्वेदिक चहाचा समावेश केल्यास आराम मिळू शकतो .

१ .आपल्याला उच्च टेस्टोस्टेरॉन ,हर्सुटिझम आणि ओव्हुलेशनच्या समस्येचा सामना करत असाल तर ,सुपरमिंटच्या चहाचे सेवन केल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकते .हे ओव्हुलेशनला प्रोत्साहन देते आणि एन्ड्रोजन कमी करते .हे रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने अनेक फायदे होतात.

Pcos problem, Health issue, Ayurvedic tips
World breastfeeding week : बाळाला दूध पाजणाऱ्या आईला अशक्तपणाला आल्यास , बाळाला होऊ शकतात हे आजार

२. अदरक महिलांच्या शरीरात उपस्थित हार्मोन्सचे नियमन करण्याचे काम करते .आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात .जे पीसीओएसमुळे होणारी मूड स्विंग आणि डोकेदुखी यांसारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते .याचे दिवसातून एकदा केल्यास फायदा (Benefits) होईल.

३. ग्रीन टी ही पीसीओएसने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे .जास्त वजन आणि लठ्ठ महिलांमध्ये इंसुलिन प्रतिरोधकता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यात योगदान देते .

४. दालचिनी आपल्या शरीरात वाढलेली रक्तातील साखर व इंसुलिनची पातळी कमी करण्याचे कार्य करते .यासोबतचआपले वजनही कमी करण्यास व मासिक पाळी नियमित येण्यास मदत करते .आपण दिवसभर कधीही याचे सेवन करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com