Parenting Tips, Child Mental Health Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, या कारणांमुळे मुलांना करावा लागतो डिप्रेशनचा सामना; लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

Child Mental Health : हल्ली लहान मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यावर वेळीच मात न केल्यास परिणाम गंभीर होतात. मुलांमध्ये नैराश्याची कारणे अनेक असू शकतात. पालकांनी ती वेळीच ओळखायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल

कोमल दामुद्रे

Child Mental Trauma :

व्यस्त जीवनशैली आणि कामाच्या व्यापामुळे पालकांना आपल्या मुलांकडे व्यवस्थितरित्या लक्ष देता येत नाही. पालक मुलांबद्दल अतिसंवेदनशील असतात म्हणून त्यांनी केलेल्या चुकांवर ते ओरडतात.

पालकांनी (Parents) ओरडल्यामुळे वाढत्या वयात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (Health) परिणाम होतो. हल्ली लहान मुलांमध्ये नैराश्याचे (Depression) प्रमाण अधिक वाढले आहे. यावर वेळीच मात न केल्यास परिणाम गंभीर होतात. मुलांमध्ये नैराश्याची कारणे अनेक असू शकतात. पालकांनी ती वेळीच ओळखायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल

1. विभक्त कुटुंब

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती परंतु, सध्या विभक्त कुटुंब पाहायला मिळत आहे. एकत्र कुटुंबात मुलांना अनेकांचे प्रेम भेटायचे हल्ली मिळत नाही. दिवसभर पालक कामात व्यस्त असल्यामुळे मुलांना एकटे वाटते. त्यामुळे त्यांना नैराश्य येते.

2. ओरडणे

अनेकदा पालक मुलांची चूक झाली की, त्यांना ओरडतात, रागवतात. परंतु, वाढत्या वयात मुलांना या गोष्टी समजत नाही. त्यामुळे ते चुकीचे पाऊल उचलतात. पालकांनी मुलांना अशावेळी शांतपणे समजावून सांगणे गरजेचे आहे.

3. मनातले बोलणे अशक्य

बरेचदा पालक मुलांशी बोलत नाही. दिवसभराच्या थकव्यामुळे ते मुलांपासून दूर राहातात. न्यूक्लियर फॅमिलीमुळे मुलांना घरात एकटे वाटते. त्यांच्या भावना शेअर न करता येत असल्यामुळे त्यांना नैराश्य येते.

4. मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे

  • थकवा

  • स्वभावातील हावभाव

  • ऊर्जेची पातळी कमी होणे

  • झोपेशी संबंधित समस्या

  • नकारात्मक विचार

  • नेहमी पेक्षा जास्त किंवा कमी खाणे

  • सतत चिडचिड करणे

  • एकाच जागी शांतपणे बसून राहाणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT