पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. पॅन कार्डचा वापर करुन आपली अनेक कामे होतात. परंतु अनेकांना असे वाटते की, पॅन कार्डचा वापर फक्त बँक खाते आणि आयकर भरण्यासाठी होतो. परंतु पॅन कार्ड हे इतर अनेक गोष्टींसाठी आवश्यक आहे.
बँक खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड (Pan Card)आवश्यक आहे. तसेच आयटीआर भरायचा असेल तर पॅन कार्डची गरज असते. झीरो बँलेन्स खातेव्यतिरिक्त सर्वच बँक (Bank) खात्यांसाठी पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
तुम्हाला बँक खात्यात 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करायची असल्यास पॅन कार्डची डिटेल्स देणे आवश्यक असते. 50000 रूपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार करायचा असल्यास पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पॅन कार्डवरील परमनंट अकाउंट नंबर हा महत्त्वाचा असतो. त्यामुळेच बँकेची सर्व कामे होतात.
दागिने खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक
सणासुदीला मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करतात. तसेच लग्न (Marriage) सोहळ्यासाठीही दागिने खरेदी केले जातात. जर तुम्ही 2 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने खरेदी करत असाल तर पॅन कार्ड डीटेल्स देणे अनिवार्य आहे.
कार खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड महत्त्वाचे
जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची कार खरेदी करायची असल्यास तुम्हाला अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. यात पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. याचसोबत कार विकायची असेल तर कारची कागदपत्रे आणि KYCसह पॅन कार्डची आवश्यकता आहे.
प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री
भारतात 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीची प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर पॅन कार्ड डिटेल्स दाखवावे लागेल. मालमत्तेच्या लेखी कागदपत्रांमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघांचेही पॅन कार्ड महत्त्वाचे आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक
शेअर बाजारात 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे. शेअर बाजारात डीमॅट अकाउंटद्वारे गुंतवणूक केली असेल तर SEBIने पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक केले आहे.
विदेश चलन खरेदी
परदेशात जाण्यासाठी भारतीय चलन दुसऱ्या चलनासोबत बदलावे लागते. यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक असतात. यासाठी अधिकृत एक्सचेंज ब्यूरो आणि बँक तुमच्या पॅन कार्डची डिटेस्ल मागते. परकीय चलनात कोणताही व्यव्हार करायचा असल्यास पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.