Morning Body Pain saam tv
लाईफस्टाईल

Morning Body Pain: सकाळी उठताच अंग दुखत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा; 'या' गंभीर समस्येचं आहे लक्षण

Morning Body Pain Causes: सकाळी उठल्यावर तुम्हालाही संपूर्ण शरीरात वेदना जाणवतात. जर तुम्हालाही अशा वेदना जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पूर्ण झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यास आपल्याला फ्रेश वाटतं. मात्र याउलट काही लोकांना सकाळी उठल्यानंतर अचानक शरीरात वेदना जाणवू लागतात. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर सावध व्हा. बरेच लोक सकाळी शरीरातील वेदना थकवा, चुकीच्या स्थितीत झोपणं किंवा वाढत्या वयाचं लक्षण मानून याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हा एक गंभीर आजार असू शकतो.

सकाळी शरीरात वेदना होणं कोणत्या आजाराचं लक्षण?

सकाळी शरीरात वेदना होणं हे थायरॉईडच्या समस्येमुळे देखील असू शकते. हायपोथायरॉईडीझममध्ये देखील, शरीरात वेदना होण्याची समस्या सामान्य होते. थकवा, वजन वाढणं आणि थंडी वाजणं ही इतर लक्षणं आहेत.

थायरॉईडमध्ये सकाळी शरीरात वेदना का होतात?

  • थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळे शरीराची ऊर्जा निर्मिती प्रक्रिया मंदावू लागते. ज्यामुळे शरीरात वेदना जाणवू लागतात.

  • ज्यावेळी थायरॉईड कमकुवत होतो तेव्हा स्नायूंमध्ये माइक्रो-इंफ्लामेशन होऊ शकतं. जो सकाळी उठल्यावर जास्त जाणवतो.

  • गुडघे, खांदे आणि मानेमध्ये जडपणा आणि वेदना असू शकतो.

  • रात्रीच्या झोपेनंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही. सोबत शरीरात वेदना होतात.

सकाळी उठल्यावर शरीरात वेदना जाणवत असतील तर काय करावं?

थायरॉईडची नियमित तपासणी करा (TSH, T3, T4 चाचण्या)

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घ्यावीत.

प्रथिने आणि आयोडीनयुक्त आहार घ्यावा.

दररोज व्यायाम करा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT