Overuse of earphones can be dangerous to health
Overuse of earphones can be dangerous to health ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

इअरफोनचा अतिवापर आरोग्यास ठरेल घातक !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार आजकाल प्रत्येकाच्या ओठी गाणी गुणगुणता आपण ऐकत असतो. ट्रेन, बस किंवा रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कानात इअरफोन आपल्याला दिसून येतात.

हे देखील पहा -

सतत कानात इअरफोन घातल्याने आपल्या आरोग्याला त्याचा धोका होऊ शकतो. फ्रान्समधील संशोधनानुसार सतत इअरफोनच्या वापरामुळे चारपैकी एका व्यक्तीला ऐकण्याचा त्रास होत आहे. तेथील २५ टक्के लोकसंख्या अशी आहे ज्यांना बहिरेपणा आला आहे. याचे संशोधन केल्याने १८ ते ७५ वर्षे वयोगटातील बहुतांश लोकांचा समावेश आहे. याचे कारण बदलेली जीवनशैली, नैराश्य आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे ऐकण्याची समस्या निर्माण होत आहे.

इअरफोनचा अतिवापर आरोग्यावर कसा करेल परिणाम-

१. हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. जास्त वेळ (Time) इअरफोन लावून गाणी ऐकल्याने कानात बधीरपणा येऊ शकतो. इयरफोनच्या जास्त वापरामुळे चक्कर येणे, झोप न लागणे, डोकेदुखी आणि कान दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो.

२. हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने केवळ कानांवरच नाही तर त्याचा आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. इतकेच नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही वाढतो. म्हणून गाणी ऐकताना त्याचा आवाज कमी असावा.

३. आपले इअरफोन (Earphones) किंवा हेडफोन कोणाला ही शेअर करू नका. बऱ्याचदा आपण आपले इअरफोन किंवा हेडफोन इतरांना वापरण्यास देतो त्यामुळे आपल्याला कानाचे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

४. दररोज हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने आपल्या कानाच्या पडद्याला हानी पोहोचू शकते. याशिवाय मेंदूचेही खूप नुकसान होते त्यामुळे आपल्याला अनेक मानसिक आजारांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच डोकेदुखी, निद्रानाश यांसारखे आजारही होऊ लागतात.

५. कानाशी संबंधित इतर समस्या टाळायच्या असतील तर गरजेपूर्ता इअरफोनचा वापर करा. स्वस्त इअरफोन्सऐवजी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरा. दिवसातून ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ इअरफोनचा वापर करु नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT