भारतात दरवर्षी सुमारे 4 ते 5 लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र उपलब्ध अवयव आणि गरजू रुग्ण यांच्यातील मोठ्या तफावतीमुळे प्रत्यक्षात 10 टक्क्यांहून कमी रुग्णांनाच प्रत्यारोपणाचा लाभ मिळतो. ही तफावत दूर करण्यासाठी अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. याच उद्देशाने Sir H. N. Reliance Foundation Hospital तर्फे ‘Bandhan of Life’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात माहितीपूर्ण सत्राने करण्यात आली. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले ते प्रतीकात्मक ‘रक्षाबंधन’. अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांना खास तयार केलेल्या राख्या बांधल्या, तर डॉक्टरांनी अवयवदाते कुटुंबीयांना राखी बांधली. ‘Bandhan of Life’ या संकल्पनेतून अवयवदाते, डॉक्टर आणि अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण यांच्यातील जीवनाच्या धाग्याने जोडलेले भावनिक नाते अधोरेखित करण्यात आलं. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केलं. “अवयवदान म्हणजे जीवनाची सर्वात शुद्ध भेट आहे. हे असे संकल्प आहेत जे दुःखाचं रूपांतर आशेत आणि हानीचं रूपांतर नव्या जीवनात करतं. प्रत्येक अवयवदाते कुटुंबाचे धैर्य दुसऱ्या व्यक्तीसाठी नव्या उद्याची सुरुवात ठरू शकते. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करून अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करणे हा आमचा उद्देश आहे,” असे त्यांनी सांगितलं.
डॉ. आकाश शुक्ला, Director – Hepatology, Sir H. N. Reliance Foundation Hospital यांनी भारतातील अवयव प्रत्यारोपणाची गरज आणि उपलब्धतेतील तफावत अधोरेखित केली. “इतरांचे प्राण वाचवण्यासाठी कोणतीही व्यक्ती करू शकणाऱ्या महान कार्यांपैकी अवयवदान हे एक आहे. भारतात दरवर्षी सुमारे 4 ते 5 लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते. मात्र, ही गरज आणि उपलब्ध अवयव यांच्यातील अंतर खूप मोठे आहे. प्रत्यक्षात 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होतात. त्यामुळे समाजाने या चांगल्या कार्यासाठी पुढे येऊन अवयवदानाची प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे.
अवयवदानाची प्रक्रिया दाते कुटुंबीयांसाठी अधिक संवेदनशील आणि सुलभ करण्याच्या दिशेने Sir H. N. Reliance Foundation Hospital ने रुग्णालयाच्या परिसरातच मेडिको-लीगल पोस्टमार्टमची सुविधा उपलब्ध करून दिलीये. JJ Hospital च्या फॉरेन्सिक टीम आणि Mumbai Police यांच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आलीये.
या सुविधेमुळे अवयवदाते कुटुंबीयांना आपल्या प्रिय व्यक्तीचं पार्थिव सरकारी रुग्णालयात नेण्याचा अतिरिक्त त्रास टाळता येणार आहे. अवयवदानाच्या प्रक्रियेदरम्यान कुटुंबीयांना होणारा मानसिक आणि भावनिक ताण लक्षात घेता हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं.
डॉ. राहुल पंडित, Chair – Critical Care यांनीही अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली. “जागरूकता ही स्वीकाराची पहिली पायरी आहे. अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून आणि त्यामागील सत्य लोकांपर्यंत पोहोचवून कुटुंबांनी अवयवदानाकडे करुणा आणि माणुसकीच्या भावनेतून पाहावं, हा आमचा प्रयत्न आहे. अवयवदानाचा प्रत्येक निर्णय अनेकांचं प्राण वाचवण्याची क्षमता ठेवतो.”
भारत सध्या एकूण अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच जिवंत व्यक्तींकडून होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, देशातील अवयवदानाचा दर दर दहा लाख लोकसंख्येमागे एका दात्यापेक्षाही कमी असल्याने अवयवांची उपलब्धता वाढवण्याचे मोठं आव्हान कायम आहे.
डॉ. अन्वय मुळे, Director – Advanced Cardiac Surgery & Heart Transplant यांनी नागरिकांना अवयवदानाची प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलंय. “अवयवदान हे मानवतेच्या सेवेसाठी केलेलं सर्वोच्च कार्य आहे. भारताने अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरी अवयवदानाचा दर अजूनही चिंताजनक आहे. ही जागं होण्याची आणि एकत्र येऊन अवयवदानाची प्रतिज्ञा करण्याची वेळ आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जीव वाचवता येतील.” असं त्यांनी म्हटलंय.
या उपक्रमात डॉक्टर, अवयवदाते कुटुंबीय आणि अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. तरंग ज्ञानचंदानी, Group CEO – Healthcare Initiatives आणि CEO, Sir H. N. Reliance Foundation Hospital तसेच डॉ. अनिल कुमार, Director, National Organ & Tissue Transplant Organisation (NOTTO), Directorate General of Health Services, Ministry of Health & Family Welfare, Government of India यांच्या उपस्थितीत झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.