Lung disease: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा फुफ्फुसं निकामी होण्याचा धोका वाढतोय

Surabhi Jayashree Jagdish

तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला

सलग तीन ते आठ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला सुरू असेल तर तो सामान्य समजू नये. खोकल्यासोबत कफात रक्त येणं, कफाचा रंग बदलणं किंवा श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणं ही धोक्याची लक्षणं असू शकतात.

Lung health | saam tv

श्वास घेण्यास त्रास होणं

थोडं चालल्यावर, जिने चढताना किंवा कोणतेही श्रम न करता श्वास लागणं ही सामान्य बाब नाही. श्वास घेताना घरघर आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा फुफ्फुसातील सूज यांचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

Persistent cough | saam tv

आवाजात बदल

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज बसणं किंवा आवाजात सतत बदल जाणवत असेल तर त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. कोणतेही विशेष श्रम न करता सतत थकवा जाणवत असेल, तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचे ते लक्षण असू शकतं.

COPD | saam tv

छातीत वेदना

श्वास घेताना, खोकताना किंवा दीर्घ श्वास घेताना छातीत वेदना किंवा जडपणा वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष नको. सतत छातीत वेदना होत असतील तर ते न्यूमोनिया किंवा इतर गंभीर फुफ्फुसविकाराचं लक्षण असू शकते.

Pneumonia | saam tv

श्वसनमार्गाचा संसर्ग

वर्षातून दोन ते तीन वेळा न्यूमोनिया, ब्राँकायटिस किंवा छातीचा संसर्ग होत असेल तर फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचा तो संकेत असू शकतो. Antibiotics घेतल्यानंतरही संसर्ग लवकर बरा होत नसेल, तर त्यामागे COPD किंवा सिस्टिक फायब्रोसिससारखा आजार असण्याची शक्यता असते.

Bronchitis | saam tv

लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक

अनेक रुग्ण योग्य वेळी तपासणी करत नाहीत आणि आजार पुढील टप्प्यात पोहोचतो. कोणतंही लक्षण दीर्घकाळ असेल तर स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Respiratory infection | saam tv

वेळेत तपासणी

फुफ्फुसांचं आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेल्यास त्यावर उपचार करता येतात. विशेषतः धूम्रपान करणारे, प्रदूषित वातावरणात काम करणारे आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींनी नियमित फुफ्फुसांची तपासणी करून घ्यावी.

Hoarse voice | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

Liver Cirrhosis | saam tv
येथे क्लिक करा