Saam Tv
चेहऱ्यावर येणारे प्रत्येक डाग सौंदर्याची लक्षणे नसतात, काही डाग आजारांची लक्षणे देखील असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
चेहऱ्यावर दिसणारे पांढरे डाग हे कोरडी त्वचा, बुरशीजन्य संसर्ग, सूर्यप्रकाशाचा परिणाम किंवा त्वचेतील रंगद्रव्य कमी होणे अशा विविध कारणांमुळे चेहऱ्यावर डाग दिसू शकतात.
कोरड्या त्वचेमुळेही डाग चेहऱ्यावर दिसू शकतात. त्वचेत ओलावा कमी झाल्यास लहान पांढरे किंवा फिकट डाग पडतात. यासाठी नियमित मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
काही डाग हे संसर्गजन्य आजारांचे लक्षण देखील असू शकतात. खाज, हलकी सोलणारी त्वचा किंवा पसरत जाणारे पांढरे डाग दिसत असतील, तर ते बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते.
काही वेळा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D किंवा इतर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतात. विशेषत: लहान मुलांमध्ये ही लक्षणे पटकन दिसू शकतात. त्यामुळे त्वचेत बदल जाणवतात यासाठी लहांन मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.
काही खूप वेळ उन्हात राहिल्याने अतिनील किरणांमुळे त्वचेतील रंगद्रव्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेर पडताना उन्हापासून रक्षण करण्यासाठी टोपी , स्कार्फ यांचा वापर करा. शक्य असल्यास SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरा.
चेहऱ्यावर डाग आले असतील तर यावर कोणतेही घरगुती उपाय अजिबात करू नका,यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम दिसू शकतात.
सौम्य फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि पुरेसे पाणी यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.