Health Tips : शरीरातून येतोय घामाचा वास? मग महागडं परम्युम कशाला सोप्या उपायांनी मिळवा नैसर्गिक फ्रेशनेस

Saam Tv

शरीराला येईल फ्रेश सुगंध

वाढत्या उष्णतेमुळे कोणतेही काम केलं की लगेच घाम येतो. घामानेच अंग चिंब भिजून जाते. त्यामुळे घामाचा घाण वास अंगाला येत असतो. कितीही परम्यूम मारले तरी देखील बऱ्याचवेळा वास काही जात नाही.

Health Tips | pintrest

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये अल्कलायिन गुणधर्म असतात. अंघोळीच्या पाण्यात १ ते २ चमचे बेकिंग सोडा मिसळल्यास त्वचा संतुलित होते. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होत नाही.

baking soda | pintrest

तुरटी

घामाचे छिद्र तुरटीमुळे संकुचित होतात. त्यामुळे घाम येण्याची प्रक्रिया मर्यादित होते.तुरटीमध्ये अॅस्ट्रींजंट आणि अँटीसेप्टीक जास्त असल्याने अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी. त्यामुळे अंगाला येणाऱ्या दुर्गंधावर नियंत्रण मिळवता येते.

Alum | pintrest

लिंबाचा रस

अंघोळीच्या पाण्यात लिंबू पिळल्याने त्वचेला फ्रेशनेस मिळतो. लिंबावर अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. ते त्वचेवर अॅसिडची लेयर तयार करते. त्यामुळे शरीराला दुर्गंध येत नाही.

lemon juice | Health Tips

गुलाब पाणी

घामामुळे त्वचेवर येणारी खाज जळजळ, रॅशेस शांत करण्यासाठी गुलाब पाण्याने अंघोळ करा.

rose water | pintrest

एप्सम सॉल्ट किंवा साधे मीठ

जास्त घामामुळे शरीर लगेच थकते. चेहरा निस्तेज होतो. त्यासाठी पाण्यात साधे मीठ किंवा एप्सम सॉल्ट मिसळल्याने डेड स्किन निघून जाते. थकवा दूर होतो.

salt | Health Tips

दिवसातून दोन वेळा अंघोळ

दिवसातून दोन वेळा अंघोळ करणे गरजेचे नसते, पण जर जास्त घाम येत, थकला असाल तर फ्रेशनेससाठी अंघोळ करावी.

bath | pintrest

कॉटनचे कपडे

नायलॉन किंवा इतर कापडाचे कपडे घातल्याने घाम शोषला जात नाही. त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. पण सुती कपडे घाम लगेच शोषून घेतात, हवा खेळती राहते.

cotton clothes | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health-Tips | PINTREST

Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

Skin Problems Alert | Chatgpt
येथे क्लिक करा