Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

Saam Tv

त्वचेवरील बदल गंभीर आजार

चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणारे काही बदल केवळ सौंदर्याशी संबंधित नसतात. त्वचेचा रंग बदलणे, खाज येणे, नवीन डाग दिसणे ही गंभीर आजारांची सुरुवात असू शकते.

Skin Problems Alert.jpg | pintrest

अचानक काळे डाग पडणे

मान,काखेत किंवा शरीरावर अचानक गडद डाग दिसू लागल्यास ते इन्सुलिन वाढल्याचे लक्षण आहे. हे डाग मधुमेहाशी संबंधित देखील असू शकतात. महिलांमध्ये हे ( PCOS ) चे लक्षण देखील असू शकतात.

Skin Problems Alert.jpg | pintrest

जखम लवकर न भरणे

लहान जखमही भरून येण्यासाठी खूप वेळ लागत असेल, तर मधुमेह किंवा रक्ताभिसरणाच्या समस्येचा संकेत असू शकतो. काही वेळा हा त्वचेच्या कन्सरची देखील सुरूवात असू शकते.

Skin Problems Alert | pintrest

सतत खाज आणि कोरडी त्वचा

जर कोणत्याही कारणाशिवाय सतत खाज, त्वचेचा अति कोरडेपणा जाणवत असेल तर हे थायरॉईड, किडनी किंवा इतर आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते.

Skin Problems Alert | pintrest

नवीन तीळ किंवा जुन्या तिळात बदल

तिळाचा आकार वेगाने वाढणे, रंगात बदल किंवा मुरूमासारखा भाग वेगाने वाढणे, नखाखाली काळ्या रेषा दिसणे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Skin Problems Alert | pintrest

निळसर किंवा फिकट त्वचा

कुठेही चट्टे न लागता शरीरावर निळे किंवा काळे डाग पडत दिसले तर व्हिटॅमिन सी ची कमतरता, शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळणे, रक्ताची कमतरता किंवा रक्ताभिसरणातील अडचणीमुळे त्वचेचा रंग बदलू शकतो.

Skin Problems Alert | pintrest

डोळ्यांभोवती पिवळे डाग

डोळ्यांच्या आजूबाजूला किंवा पापण्यांवर, पापण्यांच्या कडेला पिवळसर उभट डाग दिसले तर हे कोलेस्ट्ऱॉल वाढल्याचे लक्षण असू शकते.

Skin Problems Alert | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

doctor-prescription | pintrest

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

HAIR CARE TIPS | CHATGPT
येथे क्लिक करा