Saam Tv
मेहंदीमध्ये कॉफी पावडर मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना तपकिरी रंग मिळण्यास मदत होते आणि पांढरे केस काही प्रमाणात झाकले जातात.
नारळाच्या तेलात कढीपत्ता उकळून ते तेल थंड झाल्यावर केसांच्या मुळांवर मसाज करा.आठवड्यातुन २-३ वेळा लावून मसाज केल्याने काही दिवसातच परिणाम दिसून येईल.
चहापत्ती पाण्यात उकळवा, त्याचा रंग गडद काळा झाल्यावर थंड करून केसांवर लावा. केसांना हलक्या हाताने मसाज करा यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग मिळण्यास मदत होऊ शकते.
काळ्या मिरीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस किंवा दही मिक्स करा. केसांना मुळापासून व्यवस्थित पेस्ट लागू द्या आणि १ तासाने धुवून टाका. आठवड्यातून २-३ वेळा याचा वापर केल्यास केस काळे होण्यास मदत होते.
जास्वंदी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. पण पांढऱ्या केस देखील यामुळे काळे होऊ शकतात. रात्रभर जास्वंद पाण्यात भिजवून ठेवा,त्यापाण्यालने केस धुवा.
भृंगराज केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.भृंगराज तेलात नारळाचे किंवा तिळाचे तेल मिक्स करून उकळून घ्यावे . थंड झाल्यावर केसांना लावल्याने १ तास झाल्यावर धुवून टाका.
आवळा पावडर आणि मेथी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक केसांवर ३०-४५ मिनिटे लावल्याने केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत होते.
अॅलोवेरा जेलमध्ये आवळा पावडर मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि ते मऊ व चमकदार दिसण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.