Weight Loss Tips : फक्त २० मिनिटे करा ही योगासने; पोटावरील चरबी होईल कमी

Saam Tv

पोटाचा वाढलेला ढेर

पोटाचा वाढलेला ढेर आपल्यासाठी त्रासदायक आणि समोरच्या लोकांसाठी हसण्याचे कारण ठरते. वाढलेल्या ढेरीमुळे अनेक आजारांचे देखील बळावतात. घरीच काही योगसने करून वाढलेले पोट कमी करू शकता.

weight loss tips | pintrest

सूर्यनमस्कार

रोज १० ते १२ सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यामुळे कॅलरी बर्न होतात, रक्ताभिसरण सुधारते, मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

weight loss tips | pintrest

ताडासन

योगासने सूरू करण्यापूर्वी सगळ्यात सोप्प्या असणाऱ्या ताडासनापासून सुरूवात करा. ताडासनामुळे शरीराला ताण मिळतो आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते. या आसनाने पोट आणि कमरेला ताण मिळतो.

weight loss tips | pintrest

पश्चिमोतानासन

या आसनात संपूर्ण ताण पोटावर विशेषत: ओटीपोटावर दाब येतो. पायाच्या टाचेपासून डोक्यापर्यंत शरीराचा पाठीकडील भाग ताणला जातो. यामुळे लवचिकता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.

weight loss tips | pintrest

भुजंगासन

भुजंगासन आसन पोट, कंबर आणि पाठीच्या स्नायूंना ताण देते. पचनक्रिया सुधारण्यास, शरीराची लवचिकता वाढवण्यास आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करते.

weight loss tips | google

नौकासन

नौकासन करताना शरीराचा तोल बोटीप्रमाणे ठेवला जातो. यामुळे पोटाचे स्नायू सक्रिय होतात, कोअर मजबूत होतो आणि नियमित सरावाने पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते.

weight loss tips | google

हस्तपादासन

हस्तपादासन या आसनाच्या अभ्यासात कंबर आणि पोटावर जास्त ताण येतो. कंबर तसंच पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होत असल्यानं पोटावरील चरबी कमी होते.

weight loss tips | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

weight loss tips | google

Monsoon Skin Care : पावसाळ्यात त्वचा निरोगी ठेवायचीये? मग घरीच बनवा हे फेस पॅक; चेहरा होईल टवटवीत

Monsoon Skin Care | pintrest
येथे क्लिक करा