Shruti Vilas Kadam
पावसाळ्याच त्वचा निस्तेज किंवा चिकट होते त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स दिसू लागतात. काही नैसर्गिक पॅक तयार करून तुम्ही चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणू शकता.
पावसाळ्यात त्वचेची समस्या निर्माण होते. संसर्गाचा धोका अधिक असतो. यासाठी हा फेस पॅक अतिशय उपयुक्त ठरतो. कडुनिंबाची पाने, हळद पावडर, गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा, १५ मिनिटे चेहऱ्याला लावून धुवून टाका.
तेलकट त्वचेसाठी हा पॅक फायद्याचा आहे. बेसन ,दही त्यावर लिंबाचा रस पिळून मिश्रण तयार करा. २० मिनिटे लावल्यानंतर धूवून टाका. बेसन चेहऱ्यावरील तेल शोषून घेते आणि दही त्वचेला हायड्रेटेड करते.
पावसाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येते. काकडी आणि कोरफडीचे मिश्रण लावल्याने थकवा दूर होतो आणि त्वचेला डीप हायड्रेशन मिळते.
बेसन, हळद, गुलाब पाणी यांचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने पावसाळ्यात निस्तेज, कोरडा, काळवंडलेला चेहरा उजळण्यास मदत होते.
पिकलेले केळं मॅश करून त्यात एक चमचा मध टाकून मिश्रण तयार करा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
कडूनिंबाची पाने आणि पुदीना वाटून. थोडे गुलाबजल मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया आणि मुरूम कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.