Beauty Tips : खूप थकवा आला आहे का? विकेंडला घरच्या घरीच करा स्पा; या टिप्स करा फॉलो

Saam Tv

सुगंधी वातावरण तयार करा

सुगंधी मेणबत्ती, डिफ्यूझर किंवा इन्सेशिअल तेलांचा वापर करून घरात शांत आणि रिलॅक्स वातावरण तयार करा.

BEAUTY TIPS : SCENTED CANDLES | PINTREST

शांत म्युझिक

मनाला शांत करणारी जुनी गाणी किंवा नैसर्गिक आवाज, पक्षांचे आवाज,वाहणाऱ्या पाण्याचा आवाज लावून शांतता निर्माण करू शकता.

BEAUTY TIPS : MUSIC THERAPY | PINTREST

कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा

चेहरा कोमट पाण्याने धुवा किंवा १५-२० मिनिटे वाफ घ्या. यामुळे त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल निघण्यास मदत होते.

BEAUTY-TIPS | PINTREST

घरगुती फेस स्क्रब वापरा

कॉफी, साखर किंवा ओट्समध्ये मध मिसळून हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून त्वचा मऊ होते. बॉडीवरही हा स्क्रब वापरू शकता.

BEAUTY-TIPS | PINTREST

फेस पॅक लावा

बेसन, दही, हळद किंवा अ‍ॅलोवेरा जेलचा फेस पॅक १५-२० मिनिटे लावू शकता किंवा मुलतानी माती, मध-लिंबाचा फेस पॅक लावू शकता .यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

BEAUTY-TIPS | PINTREST

हात-पायांना मसाज करा

कोमट पाण्यात मीठ टाकून १०-१५ मिनिटे हात किंवा पाय बुडवून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा.

BEAUTY-TIPS HAND MASSAGE | PINTREST

चेहऱ्याचा हलका मसाज करा

बदाम,नारळ किंवा कोरफड जेल लावून ५-१० मिनिटे चेहऱ्याचा मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

BEAUTY-TIPS FACE MASSAGE | PINTREST

हेअर स्पा

केसांना नारळाचे तेल, कोरफड जेल आणि दही एकत्र करून हेअर मास्क लावा आणि गरम पाण्यात टॉवेल घट्ट पिळून केसांना गुडांळा त्यामुळे मास्क व्यवस्थित मुरेल.

BEAUTY-TIPS HAIR SPA | PINTREST

डोळ्यांना थंडावा द्या

थंड काकडीचे तुकडे किंवा थंड ग्रीन टी बॅग्स १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.

BEAUTY-TIPS EYE CARE | PINTREST

स्पानंतर मॉइश्चरायझर लावा

स्पाच्या शेवटी मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवातो . यामुळे स्पाचा परिणाम अधिक काळ राहतो.

BEAUTY-TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BEAUTY-TIPS EXPERT | PINTREST

Beauty Tips : महागड्या क्रीम्सवर हजारो रुपये खर्च कशाला? डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय!

remedies-for-dark-circle | meta ai
येथे क्लिक करा