Saam Tv
डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स संपूर्ण चेहऱ्याचा लूक बदलतात. कितीही प्रयत्न केले तरी डार्क सर्कल्सपासून सुटका मिळत नाही. मग हे काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंगचे गुणधर्म असतात. बटाटामध्ये एलोवेरा जेल मिसळून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो . त्यामुळे वर्तुळे फिकट होतात.
डार्क सर्कल्सवर मध लावल्यास त्वचेला मऊपणा मिळतो. एलोवेरा जेलमधे मध मिसळून लावल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहतो. थकलेले डोळे शांत होतात आणि उजळपणा मिळतो.
एलोवेराचा आवर्जुन वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. एलोवेरा डोळ्यांना थंडावा देते. त्वचेतील रक्ताभिसरण वाढते त्यामुळे काळसरपणा कमी होतो.
काकडीमध्ये नैसर्गिक थंडावा असतो.सतत जळजळ किंवा रखरख करणाऱ्या डोळ्यांवर काकडीचा वापर केल्यास डोळ्यांना शांतता मिळते.
बदामाच्या तेलात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन ई असल्याने डोळ्यांना सुंदरता मिळते शिवाय हलक्या हातांनी मसाज केल्यास थकवा कमी होतो.
कापसाचा बोळा गुलाब पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांवर ठेवल्यास गुलाबपाणीमुळे त्वचेचा टोन सुधारतो आणि थकवा दूर होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.