Tomato Juice for Diabetes saam tv
लाईफस्टाईल

Tomato Juice vs Orange Juice: संत्र की टोमॅटो? ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणता ज्यूस सकाळी पिणं फायदेशीर

Tomato Juice for Diabetes: डायबिटीज असल्यास सकाळी टोमॅटोचा ज्यूस प्यावा की संत्र्याचा? कोणत्या ज्यूसमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता जास्त असते? जाणून घ्या दोन्ही ज्यूसमधील साखरेचे प्रमाण, ग्लायसेमिक इंडेक्स आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी योग्य आहारविषयक टिप्स.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा सुरू झाला की, बाजारात संत्र आणि टोमॅटो सहज पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. अनेक जण सकाळची सुरुवात ज्यूस पिऊन करतात. पण तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड शुगरचा त्रास असेल, तर सकाळी कोणता ज्यूस प्यावा, असा प्रश्न नक्कीच पडतो.

कारण काही ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं. रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्यास त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होऊ शकतो. ज्यूसमध्ये फायबर कमी असेल तर साखर आणखी वेगाने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी गोड ज्यूस पिणं टाळणं महत्त्वाचं आहे. मग टोमॅटो आणि संत्र्याच्या ज्यूसपैकी कोणता पर्याय चांगला आहे? जाणून घेऊया.

टोमॅटोचा ज्यूस डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर?

टोमॅटोचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. तो साधारण 15 ते 20 दरम्यान आहे. त्यामुळे टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यावर रक्तातील साखर एकदम वाढत नाही, तर हळूहळू वाढते. टोमॅटोमध्ये

लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. हे शरीरातील इन्सुलिनचं काम अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत करू शकतं. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सीदेखील असतं. हे घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.

संत्र्याचा ज्यूस ब्लड शुगरसाठी धोकादायक आहे का?

संत्र्याचा ज्यूस चवीला गोड आणि छान लागतो. पण डायबिटीज असलेल्या लोकांनी तो पिताना काळजी घेणं गरजेचं आहे. एका संत्र्यामध्ये साधारण 12 ग्रॅम साखर असते. एक ग्लास ज्यूस तयार करण्यासाठी साधारण 3 ते 4 संत्र्यांचा वापर केला जातो. म्हणजेच एका ग्लासातून जवळपास 35 ते 40 ग्रॅम साखर शरीरात जाऊ शकते.

ज्यूस तयार करताना फळातील बराचसा फायबर बाजूला राहतो. त्यामुळे साखर शरीरात लवकर शोषली जाऊ शकते. संत्र्याचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण 50 आहे. त्यामुळे टमाटरच्या तुलनेत संत्र्याचा ज्यूस प्यायल्यावर रक्तातील साखर वाढण्याची शक्यता जास्त असते. संत्रं पूर्ण खाल्ल्यास त्यातील फायबर शरीराला मिळतं. हे फायबर रक्तातील साखर हळूहळू वाढण्यास मदत करतं. त्यामुळे ज्यूसपेक्षा संत्रं पूर्ण खाणं अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.

ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी सकाळी कोणता ज्यूस प्यावा?

तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल आणि ज्यूस प्यायचा असेल, तर टोमॅटोचा ज्यूस हा तुलनेने चांगला पर्याय ठरू शकतो. पण हा ज्यूस तयार करताना त्यात साखर किंवा मीठ घालू नका. चव वाढवण्यासाठी थोडं काळं मीठ, भाजलेलं जिरं आणि लिंबाचा रस घालू शकता. संत्र्याचा ज्यूस प्यायचा असल्यास त्याचं प्रमाण 100 ते 150 मिलीपर्यंत ठेवा. तसंच रिकाम्या पोटी संत्र्याचा ज्यूस पिणं टाळा.

काय सांगतं संशोधन?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जेवणाच्या 30 मिनिटं आधी टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यास जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या संशोधनात टोमॅटोचा ज्यूस प्यायल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची सर्वोच्च पातळी म्हणजेच ग्लुकोज पीक 25 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं आढळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पडीक जमिनी सरकारी होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले, 'कुळ कायद्यांतर्गत...'

Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठविरोधात शेतकरी आक्रमक, मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण; काम बंद पाडलं, VIDEO व्हायरल

Women Health After 30 : वयाच्या तिशीत महिलांना १० आजारांचा धोका; ५ टेस्ट नक्की करा, गंभीर समस्यांचे वेळीच होईल निदान

Cheese Cake Recipe: बेकरीसारखा मऊ, क्रीमी आणि चविष्ट चीज केक घरी बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पनवेलकरांचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता? पाणीप्रश्नी भाजप आमदार विक्रांत पाटील आक्रमक

SCROLL FOR NEXT