Oral Health Tips saam tv
लाईफस्टाईल

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Oral hygiene: तोंडाची स्वच्छता ही केवळ दातांसाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. दिवसातून दोनदा ब्रश, फ्लॉस, नियमित डेंटल चेकअप आणि तंबाखू-धूम्रपानापासून दूर राहणे आवश्यक आहे. हिरड्यांचे आजार, तोंडाचा कॅन्सर आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी योग्य काळजी घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

तोंड हे केवळ सुंदर हास्यासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. तोंडाची योग्य स्वच्छता न राखणं, तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यामुळे तोंडाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तोंडातील बॅक्टेरियामुळे हिरड्यांचे आजार होण्याबरोबरच शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या जीवनात तोंडाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, तोंडाच्या काही आजारांचा त्रास जगभरातील अनेक लोकांना आहेत. तंबाखूचं सेवन हे तोंडाच्या कॅन्सरसाठी महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखण्यासोबतच तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला

दिवसातून 2 वेळा ब्रश करा

सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात व्यवस्थित स्वच्छ करावेत. यामुळे दातांवर साचणारा प्लाक आणि अन्नकण कमी करण्यास मदत होते.

प्रत्येक वेळी किमान 2 मिनिटं दात स्वच्छ करा

घाईघाईने ब्रश करण्याऐवजी किमान दोन मिनिटे दात घासावेत. दातांच्या पुढील आणि मागील भागासोबतच हिरड्यांच्या कडांचीही योग्य स्वच्छता करावी.

फ्लॉस आणि माउथवॉशचा वापर करा

ब्रश करताना दातांच्या मधील बारीक जागा पूर्णपणे स्वच्छ होतातच असे नाही. त्यामुळे फ्लॉसचा वापर करून दातांमधील अन्नकण आणि प्लाक काढण्यास मदत होते. माउथवॉशचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येतो.

वेळोवेळी डेंटल चेकअप करा

दात दुखत नाहीत म्हणजे दात पूर्णपणे निरोगी आहेत, असं नाही. काही समस्या सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी दंततज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

तंबाखू आणि स्मोकिंगपासून दूर राहा

तंबाखू आणि धूम्रपानामुळे तोंडाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गुटखा, खैनी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांसोबतच धूम्रपानापासूनही दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

तोंडाच्या आरोग्याचा शरीरावरही परिणाम

तोंडात असलेले बॅक्टेरिया आणि हिरड्यांचे आजार यांचा शरीराच्या एकूण आरोग्याशी संबंध असल्याचं वैद्यकीय अभ्यासातून समोर आलंय. विशेषतः हिरड्यांचे आजार आणि मधुमेह यांच्यात परस्पर संबंध आढळतो. मात्र तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे थेट मधुमेह होतो, असं म्हणणं योग्य नाही.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापूर जवळच्या सावरे गावात म्हशींना विषबाधा

PM मोदींनी घेतली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सर्वांसमोर शाळा; दहशतवादाच्या मुद्द्यावर दिला कडक मेसेज

Bedsheet Clean : घरातल्या मळलेल्या पांढऱ्या चादरी कशा स्वच्छ कराव्यात? ही एक ट्रिक ठरेल सगळ्यात भारी

Bathroom Vastu Tips: घरातील बाथरूमविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात!

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार

SCROLL FOR NEXT