उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खाताय? मग ही बातमी एकदा वाचाच
उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खाताय? मग ही बातमी एकदा वाचाच Saam Tv
लाईफस्टाईल

उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खाताय? मग ही बातमी एकदा वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात Monsoon रस्त्यावरचे चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. मात्र हे पदार्थ म्हणजे गंभीर आजारांना Diseases निमंत्रण असते. या पदार्थांवर घाण, विषाणू, जीवजंतू, माश्या प्रमाणाच्या बाहेर घोंगावत असतात. त्यांच्यापासून आपल्याला काही गंभीर आजार उदभवू शकतात.

जुलाब-

जुलाब हा पावसाळ्यात उघड्यावरील दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होऊ शकतो. या आजारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे अशक्तपणा weakness येतो.

पोटात गुबारा धरणे / पोट फुगणे शौचास घाई होणे, पोट साफ झाले नाही असे वाटणे हि याची लक्षणे आहेत.

उपाय-

शुद्ध स्वछ पाणी प्यावे, तसेच नारळपाणी, फळांचे रस, डाळीचे पाणी, लिंबूपाणी असे भरपूर द्रवपदार्थ प्यावेत. त्याचबरोबर 'ओआरएस'चाही पिणे उपयुक्त ठरू शकते.

फुड पॉईजनिंग

पावसाळ्यात उघड्यावरील चुकीचे, आरोग्यास हानिकारक आणि अस्वच्छ पदार्थ खाल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवू शकते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. गरम पाणी पिण्यानेही अराम मिळू शकतो. एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खावी. त्यामुळे देखील फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. तसेच जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.

पावसाळ्यात पोटाची काळजी :

आपल्या आहारात दररोज फळे, पालेभाज्या या पदार्थांचा समावेश केल्याने रोग प्रतिकारशक्ती immunity वाढेल.

ब्रोकोली, गाजर, हळद आणि आले यासारखे पदार्थ आपली त्वचा आणि केसांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हळद Turmeric ही औषधी वनस्पती आहे. यात भरपूर अँटीऑक्सिडंट Antioxidant गुणधर्मांचा समावेश आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अश्या पदार्थांचा समावेश करणे उत्तम ठरले.

लसून सर्दी व खोकल्यासाठी अतिशय गुणकारी पदार्थ आहे. लसूण अ‍ॅण्टिबॅक्टेरियल आहे. ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते. व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग लसणाच्या सेवनामुळे होत नाही. ताज्या कच्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT