लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग १ Saam Tv
लाईफस्टाईल

लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग १

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्तीसाठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आनंद, अर्थपूर्णता आणि आव्हान. कोणतेही काम करताना हे तीन पैलू साध्य होत असतील तर प्रगती निश्चित आहे. पण याचसोबत अनुशासित आयुष्य किंवा शिस्तबद्धता (self descipline) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाहेर कशीही परिस्थिती असली तरी आपल्या दिनचर्येची शिस्तबद्धता टिकवून केलेले काम हे आनंद आणि अर्थपूर्णता देणारं ठरेल. Online Yoga in Lockdown

लॉकडाउनमुळे बाहेरची हालचाल आणि एकंदर स्वातंत्र्य जरी सीमित असलं तरी तंत्रज्ञानामुळे आपल्या दिवसातील व्यायामाची वेळ राखीव ठेवून दिवसाचे नियोजन करणे शक्य होते. ऑनलाइन योग वर्ग हे या काळात ठरलेलं वरदान आहे. याची पावती म्हणजे माझ्याकडे योग शिकायला येणाऱ्यांचे समाधानी चेहरे आणि मेसेजेस, ज्याने माझं बळ कित्येक पटीने रोज वाढतं.

जनरल फिटनेस –

आधी नियमित व्यायाम करत असाल तर तो आता थांबवण्याचं काहीच कारण नाही. घरूनदेखील तेच बलोपासनेचं रुटीन चालू ठेवू शकता. व्यायाम न करणाऱ्यांना मी सांगेन “हीच ती वेळ”. पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, अंतःस्त्रावी प्रणाली, प्रजनन संस्था, स्नायूंची लवचिकता, पोश्चर, स्टॅमिना हे सर्व या निर्बंधाच्या काळातही उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नियमित योगासने व प्राणायाम गरजेचा आहे. भूक-झोप, त्यांच्या वेळा यांचे नियमन योगाच्या साहाय्याने शक्य आहे. Online Yoga in Lockdown

वजन कमी करायचं असल्यास -

अनेकदा काही अवघड किंवा किचकट गोष्टी साध्य करायच्या असल्यास आपण स्वतःला डेडलाईन किंवा चॅलेंज देतो. असं म्हणतात कुठलीही सवय बदलायला किंवा लावायला २१ दिवस लागतात. पहिल्या लॉकडाउनपासून असे २१ दिवस होऊन गेले. बऱ्याचदा कोणाबरोबर तरी किंवा प्रशिक्षकांच्या मदतीने आव्हान स्वीकारून त्यासाठी केलेले बदल व प्रयत्न अधिक परिणामकारक ठरतात. असे चॅलेंज स्वतःला द्या आणि जाडी कमी करण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्या.

मानसिक आरोग्य –

अवघड परिस्थितीत देखील शांती, आनंद, उत्साह, सकारात्मकता टिकवणे ही आपल्या आंतरिक प्रगतीची लक्षणे आहेत. जे नाही ते घोळवत न बसता, जे आपल्याजवळ आहे ते मध्यवर्ती ठेवून आयुष्याकडे बघणे असा “Attitude of Gratitude” जोपासायला शिकलं पाहिजे. भीती, चिंता, अनिश्चितता, एकटेपणा, मानसिक थकवा हे सर्वत्र असूनही, अवघड परिस्थितीत डोकं शांत ठेवून मार्ग काढणे यासाठी योगाची साथ हवी.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT