आजच्या धावपळीच्या जीवनात कोणी कोणत्या आजाराला कधी आणि कसे बळी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आणि त्यांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घेणं महत्त्वाचं आहे. यातच आजकाल अनेक लोक असे आहेत जे औषधे ऑनलाइन ऑर्डर करतात.
यामुळे येण्या-जाण्याचा वेळ वाचतो आणि एखाद्याला वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्समध्ये औषधं शोधावी लागत नाहीत. पण जर तुम्ही ऑनलाइन औषधे मागवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. नाही तर हीच औषध तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
1. तुम्ही ऑनलाइन औषध मागवल्यास ते बरोबर आहे की, नाही ते आधी तपासून घ्या. यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनशी तुम्ही औषधांचे नाव जुळवू शकता. तसेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना औषध दाखवू शकता, जेणेकरुन तुम्हाला समजेल की औषध योग्य आहे की नाही.
2. सहसा, जेव्हा आपण ऑनलाइन औषधे खरेदी करतो, तेव्हा असे बरेच ॲप्स असतात जे आपल्याला स्वस्त दरात औषधे देतात. मात्र अशावेळी आपण ऑफलाइन किंमत देखील जाणून घेतली पाहिजे. त्यामुळे कमी किमतीत औषध मिळण्याची शक्यता आहे. मात्र या काळात गुणवत्तेशी अजिबात तडजोड करू नका.
3. जेव्हा तुम्ही ऑनलाइन औषध खरेदी करता तेव्हा बनावट वेबसाइट किंवा ॲप्सपासून दूर रहा. ते तुम्हाला बनावट औषधे देऊ शकतात किंवा ऑफर इत्यादीचे आमिष दाखवून तुमची फसवणूक करू शकतात. म्हणूनच नेहमी विश्वसनीय ॲप्सवरूनच औषधे खरेदी करा.
4. तुम्ही ऑनलाइन औषधांची ऑर्डर देत असाल तर कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय औषधांची एक्सपायरी डेट नक्की तपासा. तसेच चुकीचे औषध आल्यास कंपनी ते परत घेईल की नाही, याची आगाऊ खात्री करा. त्यामुळे याबाबत आधी कस्टमर केअरशी चर्चा करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.