Online Fraud Protection Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Online Fraud Protection Tips : ऑनलाइन शॉपिंगचा होतोय गंडा; अशी घ्या काळजी, अन्यथा खात होईल रिकाम !

ऑनलाइन शॉपिंग करताना आपण बरेचदा कोणत्या बँकेवर अधिक ऑफर मिळते आहे हे पाहातो.

कोमल दामुद्रे

Online Fraud Protection Tips : हल्ली दिवाळीनिमित्त प्रत्येक शॉपिंग साइट्सवर सेल सुरु आहे. त्याच त्यावर अनेक सवलती देखील आपल्याला पाहायला मिळतात. सवलतीमुळे आपल्या गोष्टी खरेदी करण्याचा मोह आवरता येत नाही. तसेच त्यावर चांगल्या प्रकारचे कॅशबॅक ऑफर्स देखील मिळत आहे.

ऑनलाइन (Online) शॉपिंग करताना आपण बरेचदा कोणत्या बँकेवर अधिक ऑफर मिळते आहे हे पाहातो. बरेच लोक Flipkart, Amazon सारख्या साइट्सवरुन सतत खरेदी करत असतात. खरेदी करताना बहुतांश वेळा आपण डिजिटल पेमेंट (Payment) मोडवर क्लिक करतो. त्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. अशावेळी स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी व वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून कसे वाचाल हे जाणून घेऊया.

  • डिजिटल पेमेंटसाठी (app you use for digital payment) स्मार्टफोनवर (smartphone) विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरून (Google Play store, App Store किंवा संबंधित वेबसाइट) यावरून डाउनलोड करा.

  • एखाद्या अॅपवर संशय असल्यास ते वापरणे टाळा. अॅप डाऊनलोड करताना काही शंका आल्यास लगेच बंद करा.

  • तुमचा स्मार्टफोन विनामूल्य वाय-फाय नेटवर्क किंवा अज्ञात सार्वजनिक उपकरणाशी (free Wi-Fi network or an unknown public device) कनेक्ट करून डिजिटल पेमेंट (digital payments) करणे टाळा. असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते आणि तुमचा डेटाही चोरीला जाऊ शकतो.

  • मोबाईल फोनवर प्राप्त झालेला कोणताही OTP शेअर करू नका. (Do not share any OTP received on the mobile phone)

  • डिजिटल व्यवहारांसाठी विश्वसनीय अॅप्सचा वापर केला जात असला तरी, हे प्लॅटफॉर्म कधीही अशा गोपनीय डेटाची मागणी करत नाहीत.

  • डिजिटल पेमेंट करताना कधीही घाई करू नका. प्रत्येक देयकाची पावती मिळाल्याची खात्री करा.

  • स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेले नवीन अॅप इन्स्टॉल करताना, त्याच्याशी संबंधित प्रत्येक परवानगीची विनंती तपासल्यानंतरच ते मंजूर करा.

  • एकाच वेळी सर्व परवानग्यांना कधीही संमती देऊ नका. तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी वापरत असलेल्या अॅपच्या विश्वासार्हतेबद्दल माहिती गोळा करा.

  • तसेच नुकतेच नवीन आलेल्या अॅप्सवरुन खरेदी करण्यापूर्वी त्याची योग्य ती चौकशी करा मगच खरेदी करा व होणाऱ्या फसवणुकीपासून वेळीच थांबा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

SCROLL FOR NEXT