One Plus 12 Specification, Price, Features  Saam tv
लाईफस्टाईल

One Plus 12 वर जबरदस्त ऑफर! वायरलेस चार्जिंग, दमदार कॅमेरासह लॉन्च; किंमत पाहा

One Plus 12 Specification : मोबाईल फोन निर्माती कंपनी वनप्लसने आज त्याची नवीन सीरिज लॉन्च केली होती. टेक ब्रँडचा हा फोन आठवड्याभरापूर्वी लॉन्च करण्यात आला होता. त्याची विक्री आजपासून सुरु झाली आहे.

कोमल दामुद्रे

One Plus 12 Price :

मोबाईल फोन निर्माती कंपनी वनप्लसने आज त्याची नवीन सीरिज लॉन्च केली होती. टेक ब्रँडचा हा फोन आठवड्याभरापूर्वी लॉन्च करण्यात आला होता. त्याची विक्री आजपासून सुरु झाली आहे.

कंपनीचे (Company) सर्वात पॉवरफुल डिव्हाइस आणि दमदार कॅमेरासाठी हा फोन ओळखला जाईल. तसेच फोनच्या पहिल्या सेलमध्ये यात ग्राहकांना विशेष सूट मिळणार आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि फ्लॅगशिप कॅमेरासह बाजारात येत आहे.

हा फ्लॅगशिप फोन (Smartphone) कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ऑफलाइन स्टोअर आणि ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर खरेदी करता येईल. तसेच यामध्ये बँक ऑफर्स व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. OnePlus 12 लॉन्च करण्यात आला आहे. तर OnePlus 12R ची विक्री भारतीय बाजारात ६ फेब्रुवारीपासून सुरु होईल.

1. OnePlus 12 किंमत

भारतीय बाजारात OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत (Price) 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी ६४,९९९ रुपये इतकी आहे. तर 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६९,९९९ रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये ICICI बँक कार्डवर किंवा One card क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास २००० रुपयांची सूट मिळेल.

तसेच या फोनवर एक्स्चेंज ऑफरवर देखील प्रचंड सूट देण्यात आली आहे. यामध्ये २ रंगाचे पर्याय उपलब्ध आहे. सिल्की ब्लॅक आणि फ्लोई एमराल्ड हे रंग आहेत.

2. OnePlus 12 फिचर

स्मार्टफोनमध्ये 120HZ रिफ्रेश रेट सपोर्ट, डॉल्बी व्हिजन आणि 4500units च्या पीक ब्राइटनेससह 6.82 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन गोरिला ग्लास व्हिक्टस २ ने संरक्षित आहे असे म्हटले जात आहे.

यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोससरसह यात व्हेपर-चेंबर कूलिंग सिस्टम देखील आहे. फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 64MP 3x पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP Sony LYT- 808 प्राथमिक सेन्सरसह 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.

32MP सेल्फी कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Android 14 वर OxygenOS 14 सॉफ्टवेअर स्किन आहे. OnePlus 12 च्या 5400mAh बॅटरीला 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यामध्ये 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा लाभ देखील देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT