दिवसातून एकदाच जेवण केल्याने शरीरात हे बदल होतात, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य की अयोग्य? Saam Tv
लाईफस्टाईल

Health Benefits: दिवसातून एकदाच जेवण केल्याने शरीरात हे बदल होतात, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य की अयोग्य?

One Meal A Day: दिवसातून एकदा योग्य जेवण केल्याने तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, चांगला की वाईट? ते कोणासाठी फायदेशीर आहे आणि कोणासाठी हानिकारक आहे. सविस्तर जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसातून फक्त एकदा जेवण करून त्याचा आपल्या शरिरावर कश्या प्रकारे फायदा होतो, चांगला की वाईट? काही लोकांसाठी हे उपयुक्त ठरू शकते त्यामुळे वजन कमी होणे चयापचनाचे फयदे देखील होऊ शकतात. परंतु, काही लोकांना त्यामुळे ऊर्जेचा अभाव, पौष्टिक कमतरता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

दिवसातून फक्त एकदाच जेवण केल्याने शरीरावर त्याचा काय परिणाम होतो

या धावपळीच्या युगात, अनेकांना संतुलित आहार राखण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. त्यामुळे संपूर्ण आहार पद्धती बिघडून जाते. आपण दिवसातून एकदा जेवण केल्यास त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हल्ली काही लोक वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्या रोजच्या जीवनशैलीच्या सोयीसाठी दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात. तर काही लोक आपल्या कामात व्यस्त असतात. परंतु, दिवसातून फक्त एकदाच जेवण केल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? ओन्ली माय हेल्थ या इंग्रजी पोर्टलमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, शारदा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी सांगितले की याचा चयापचय, ऊर्जा पातळी राखणे आणि एकूण आरोग्यावर परिणाम होतो.

जास्त भूक लागण्याची शक्यता

दिवसातून फक्त एकदा जेवल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-अधिक होते. जेवणानंतर तुमच्या शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे ऊर्जेत तात्पुरती वाढ होते. जसजसा वेळ निघून जातो तसतसे शरीरात ऊर्जेची कमतरता भासू लागते. काहींसाठी हे धोकादायक ठरू शकते. असे केल्याने त्यांना खूप भूक लागू शकते. ज्यामुळे ते आधीपेक्षा जास्त खाऊ शकतात. त्यामुळे कॅलरीजचे सेवन वाढू शकते.

OMAD बद्दल सर्वात जास्त चर्चेचा विषय असा की त्याचा चयापचय प्रक्रियेवर होणारा परिणाम. काही संशोध करण्यात आले त्यात असे दिसून आले आहे की अधूनमधून उपवास करणे हे OMAD चा एक भाग आहे. यामुळे इन्सुलिनचे कार्य सुधारू शकते आणि चरबी देखील कमी होऊ शकते. दीर्घकाळ कॅलरी प्रतिबंध शरीराला चयापचय दर कमी करण्याचे संकेत देऊ शकतो. ज्यामुळे कालांतराने वजन कमी करणे कठीण होते.

पौष्टिक कमतरता आणि पचन आरोग्य

दिवसातून फक्त एकदाच जेवल्याने पोषक तत्वांची कमतरता वाढू शकते. दिवसातून फक्त एकदाच जेवण करणे चांगले आहे, पण तुम्हाला योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स मिळत आहेत का याची देखील काळजी घेतली पाहिजे. लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते. हाडांचे आरोग्य बिघडू शकते आणि स्नायूंचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव येऊ शकतो. ज्यामुळे पोटफुगी, आम्ल ओहोटी किंवा अस्वस्थता येऊ शकते.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT