Ola Electric Scooter Reverse Mode - यामुळे गाडी उलट्या दिशेनेही धावणार Saam Tv News
लाईफस्टाईल

Ola Electric Scooter Reverse Mode - यामुळे गाडी उलट्या दिशेनेही धावणार

Ola Electric Scooter येत्या १५ ऑगस्टला लॉंच होणार असून यात Reverse Mode देखील असणार आहे ज्यामुळे गाडी उलट्या दिशेला देखील धावू शकेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओला इलेक्ट्रीक स्कुटर (Ola Electric Scooter) येत्या १५ ऑगस्टला लॉंच होणार असून या स्कुटरचे आणखी एक नवीन फीचर कंपनीने रिविल केले आहे. यात रिव्हर्स मोड (Reverse Mode) देखील असणार आहे ज्यामुळे गाडी उलट्या दिशेला देखील धावू शकेल. (ola electric scooter reverse feature reveal)

कॅब सर्विस देणारी कंपनी ओलाने इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. या कंपनीची पहिली इलेक्ट्रीक स्कुटर येत्या १५ ऑगस्टला लॉंच होणार असून कंपनी या स्कुटरचे एक - एक फीचर रिविल करत आहे. आता या स्कुटरचे आणखी एक नवीन फीचर रिविल करण्यात आले आहे, ते म्हणजे रिव्हर्स मोड होय. या फीचरमुळे गाडी उलट्या दिशेला देखील चालवता येणार आहे.

हे देखील पहा -

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं की, ''रेव्हॉल्यूशन टू रिव्हर्स क्लायमेट चेंज!’ तुम्ही अविश्वसनीय गतीने रिव्हर्स जाऊ शकता आणि ४९९ या अविश्वसनीय किंमतीत गाडी बुक करु शकता, बाकी माहिती १५ ऑगस्टला.'' दरम्यान, ओला इलेक्ट्रिकला भारतातील 1000 हून अधिक शहरांमधून त्यांची पहिली EV, Ola स्कूटरसाठी बुकिंग्स मिळाल्या आहेत. तसेच केवळ २४ तासांत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी ओला ईलेक्ट्रीक स्कुटर बुक केली होती. या स्कुटरचे S, S1 आणि S1 pro असे एकुण तीन मॉडेल लाँच होणार आहेत.

या स्कुटरमध्ये लिथियम आयन बॅटरी असेल ची रिमुव्हबेल असेल. शिवाय अॅनॉय व्हील्स, डिजिटल इंस्ट्रमेंट कन्सोल आणि क्लाऊड कनेक्टीव्हीटीसारखे फीचर्स असतील. ही स्कुटर सिंगल चार्जमध्ये १५० किमी धावू शकेल असा अंदाज आहे. या स्कुटरची खासियत म्हणजे केवळ १८ मिनिटं चार्ज केल्यानंतर ही स्कुटर ४५ किलोमीटर्स धावेल. मात्र अधिकृत माहिती मिळाल्यावरच या स्कुटरची किंमत आणि फीचर्स कळू शकेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT