मानसिक आणि शारीरिक आरोग्य ही एक मोठी महत्त्वाची समस्या आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या पैकी अनेकजण कामाला जातात. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार ऑफिसच्या खुर्चीमुळे मृत्यूचा धोका १६ टक्क्यांनी वाढू शकतो.
ऑफिसमध्ये (Office) किंवा काम करताना आपण एकाच ठिकाणी अधिक वेळा बसून राहिल्यावर एकतर आपल्या पाठदुखी किंवा कंबर दुखीचा त्रास सहन करावा लागतो. महिलांना या त्रासाला अधिक सामोरे जावे लागते. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम केल्याने अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा (Disease) धोका वाढतो. जाणून घेऊया त्याबद्दल
ऑफिसचे काम करणे ही वाईट गोष्ट नाही. परंतु, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने आपल्या मोठ्या आजाराला सामोरे जावे लागू शकते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, डेस्क जॉबमुळे मृत्यूचा धोका १६ टक्के वाढू शकतो. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे १३ वर्षातील ४,८१,६८८ लोकांवर केलेल्या संशोधनात उघड झाले आहे.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक खूर्चीवर बराच वेळ बसतात त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD)मुळे मृत्यू होण्याचा धोका ३४ टक्के वाढतो. शारीरिक हालचाली केल्या नाही की, त्याचा आपल्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते.
जास्त वेळ एकाच जागी बसल्याने बीपी, शुगर, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, मेटाबॉलिक सिंड्रोम, हृदयविकार आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. शारीरिक हालचालीशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसल्यास लठ्ठपणाचा आजार वाढून मृत्यूचा धोका वाढतो.
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून कमीत कमी २२ मिनिटे शारीरिक हालचाली केल्याने दीर्घकाळ बसून राहिल्याने अनेक आजार कमी होऊ शकतात. अभ्यासानुसार आठवड्यातून १५० मिनिटे शारीरिक हालचाल, चालणे, व्यायाम करणे यांसारख्या गोष्टी केल्यास आरोग्य सुधारेल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.