Health Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Health Tips : फक्त स्वाद नाही तर तब्येतीसाठी सुद्धा गुणकारी आहे जायफळ; वाचा फायदे

Nutmeg Benefits : जायफळ विविध व्याधींसह बुद्धी तल्लख होण्यातही मदत करते. तसेच यामुळे आपला मानसीक ताण सुद्धा कमी होतो.

Ruchika Jadhav

जायफळ एक मसाल्याचा प्रकार आहे. भारतात विविध पदार्थ बनवण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जातो. तुम्ही सुद्धा पदार्थांची चव वाढावी यासाठी त्यामध्ये जायफळ आवश्य टाकत असाल. जायफळ मसाल्यातील एक पदार्थ असला तरी याचा जास्त वापर गोड पदार्थ बनवताना केला जातो. जायफळ आपल्या आरोग्यासाठी देखील फार गुणकारी आहे. त्यामुळे आज जायफळचे आजवर तुम्ही कधीही ऐकले नसतील असे गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत.

झोपेचा त्रास दूर करते

जायफळमधील विविध गुण आणि जीवनसत्व आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. रोज रात्री झोपताना दूधामध्ये जायफळ पावडर मिक्स केल्यास फायदा होतो. जायफळ खाल्ल्याने आपल्याला चांगली झोप लागते. मात्र याचा वापर अगदी प्रमाणात करावा. जास्त प्रमाणात जायफळ खाऊ नये.

सूज आणि दुखणे दूर करते

धावपळीच्या जीवनात अनेकदा आपल्याला शारीरीक दुखापती होतात. यामुळे हात किंवा पाय दुखणे, त्यांना सूज येणे या समस्या जाणवतात. जायफळात एँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे दुखणे आणि सूज दोन्ही कमी होतात. शिवाय शरीराच्या नसा, शिरा मोकळ्या राहतात.

बुद्धीसाठी उत्तम

जायफळ विविध व्याधींसह बुद्धी तल्लख होण्यातही मदत करते. तसेच यामुळे आपला मानसीक ताण सुद्धा कमी होतो. बुद्धीची कार्यक्षमता आणखी चांगली होते. शिवाय बुद्धीची एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते.

डिटॉक्सिफिकेशन करते

जायफळ मसाल्यातील असा पदार्थ आहे जो शरीरातील वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतो. दररोज जायफळाचं सेवन केल्याने सदर व्यक्तीचे लिव्हर आणि किडनी कधीच खराब होत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारात जायफळचे सेवन नक्की केले पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT