Fatty liver symptoms in women saam tv
लाईफस्टाईल

Fatty liver: आता घरबसल्या तुम्हाला समजेल फॅटी लिव्हरचा त्रास; तज्ज्ञांनी सांगितले शरीरात होणारे ५ मोठे बदल

Fatty liver symptoms: फॅटी लिव्हर ही आजकाल सर्वसामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावामुळे लिव्हरमध्ये चरबी साचते.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीचा आहार आणि दारूचं सेवन याचा तुमच्या लिव्हरवर विपरीत परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हर होण्याचाही धोका अधिक असतो. जर या समस्येची लक्षणं वेळेत ओळखली गली तर पुढील गुंतागुंतीच्या समस्या टाळता येऊ शकतात. TOI ला हार्वर्ड आणि स्टॅनफर्डमधील गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी घरबसल्या ओळखता येणारी फॅटी लिव्हरची ५ लक्षणं सांगितली आहेत. ही लक्षणं काय आहेत ते पाहूयात.

बेली फॅट वाढणं

डॉ. सेठी यांनी सांगितलं की, फॅटी लिव्हरचे पहिलं लक्षण तुमचं पोटाभोवती फॅट वाढतं. जर लिव्हरमध्ये चरही असेल तर ते योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे चरबी कंबरेभोवती साठते. शिवाय यामुळे Insulin Resistance वाढू शकते. जर आहार किंवा व्यायामात बदल न करता कंबरेचा घेर वाढत असेल, तर हे लिव्हरच्या समस्येचे संकेत असू शकतात.

सतत जाणवणारा थकवा

पूर्ण झोप झाल्यानंतरही सतत थकवा जाणवणं हे फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं. लिव्हरमध्ये फॅट साचल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. हा थकवा जास्त प्रमाणातील नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

उजव्या बरगडीखाली वेदना

आपलं लिव्हर हे उजव्या बरगडीखाली असतं. फॅटी लिव्हरमुळे सूज आल्यास या भागामध्ये हलका त्रास जाणवू शकतो. तीव्र वेदना होत नसल्या तरी जेवणानंतर किंवा शारीरिक हालचालीनंतर हा त्रास वाढू शकतो.

त्वचा आणि केसांमध्ये बदल

फॅटी लिव्हरमुळे शरीरातील टॉक्सिन पदार्थ बाहेर टाकण्याची आणि हार्मोन्स नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते. यामुळे त्वचा आणि केसांमध्ये बदल दिसून येतात. यामध्ये त्वचा कोरडी पडू लागते तर केस गळू लागतात.

भूक कमी लागणं

फॅटी लिव्हरमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. जर लिव्हरमध्ये फॅट्स असतील तर त्यामुळे योग्य पद्धतीने पचन होत नाही. परिणामी मळमळ किंवा भूक कमी होणं ही तक्रार उद्भवते. ही लक्षणं इतर पोटाच्या समस्यांशिवायही दिसू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेला सत्तेत सहभागी न घेता धुळे पालिकेत भाजपचाच महापौर बसणार?

Crime: राक्षस व्हायचा माझा बाप..., दारूच्या नशेत पोटच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Gold Rate : सोनं आवाक्याबाहेर गेलं, ४ तासात प्रति तोळा ₹२५०० नी महागले, चांदीमध्येही विक्रमी वाढ, वाचा ताजे दर

Akola : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स, कोणत्या पक्षाचा महापौर होणार?

Viral Video: मेट्रो स्टेशनवर तरूणाचा किळसवाणा प्रकार, गेटजवळच केली लघवी, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT