Healthy weight loss saam tv
लाईफस्टाईल

Healthy weight loss: जीम, डाएट करूनही वजन कमी होत नाहीये? आजपासूनच रात्रीच्या जेवणानंतर करा 5 गोष्टी

Night habits for weight loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्रीच्या जेवणानंतरच्या काही सवयी उपयोगी ठरू शकतात. हलकं चालणं, पुरेशी झोप, ताण कमी करणं, संतुलित आहार आणि आरोग्यदायी पेयांचा योग्य वापर यामुळे वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक तरुण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. यामागे चुकीचा आहार आणि बदललेली जीवनशैली ही महत्त्वाची कारणं मानली जातात. एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की, ते नियंत्रणात आणणं कठीण वाटू शकतं. वजन कमी करणं हे मोठं आव्हान वाटत असलं तरी रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल केल्यास त्यासाठी मदत होऊ शकते. तुमचंही वजन वाढत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर या गोष्टी करण्याची सवय लावा.

जेवणानंतर थोडं चालून या

रात्रीचं जेवण झाल्यानंतर काही वेळ हलकं चालणं फायदेशीर ठरू शकतं. चालण्यामुळे शरीरातील कॅलरी खर्च होण्यास मदत होते आणि शरीराची हालचाल वाढते. यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.

ग्रीन टी किंवा हर्बल टी घ्या

जेवणानंतर ग्रीन टी किंवा हर्बल टी घेण्याची सवय लावू शकता. या पेयांमुळे शरीराची चयापचयाची प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझमला मदत होऊ शकते. तसंच रात्री उशिरा काहीतरी खाण्याची इच्छा किंवा भूक नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते.

झोपेला प्राधान्य द्या

पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील हार्मोन्सच्या कामावर परिणाम होऊ शकतो आणि भूक वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री ७ ते ८ तासांची चांगली झोप घेणं महत्त्वाचं आहे. रोज पुरेशी आणि शांत झोप घेण्याची सवय लावा.

ताण कमी करण्याचा प्रयत्न करा

जास्त ताण घेतल्यामुळे अनेकदा गरज नसतानाही जास्त खाण्याची इच्छा होऊ शकते. अशावेळी गोड किंवा इतर आरोग्यासाठी घातक पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे ध्यान, दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम किंवा हलकं स्ट्रेचिंग यांसारख्या गोष्टी करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

आहाराकडेही लक्ष द्या

फक्त व्यायाम किंवा जेवणानंतरच्या सवयी बदलून वजन कमी होईलच असं नाही. त्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आहारात संपूर्ण धान्य, भाज्या आणि कमी चरबीचं प्रथिनयुक्त अन्न ठेवा आणि प्रक्रिया केलेले तसेच जास्त साखर असलेले पदार्थ शक्य तितके कमी करा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Maharashtra News Live Update: गणपती विसर्जन मिरवणूक तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिस प्रशासनाची भूमिका समोर

Good News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, २५ सप्टेंबरला मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Travel Astrology : राशीनुसार प्लान करा ट्रिप; तुमचे Lucky डेस्टिनेशन आताच जाणून घ्या, निसर्गाच्या सानिध्यात व्हा रिफ्रेश

Maharashtra : शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार, ३ दिवसांत अधिसूचना काढणार; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT