office desk vastu saam tv
लाईफस्टाईल

Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

Office Productivity: वास्तुशास्त्रानुसार ऑफिस डेस्कवरील वस्तूंचा तुमच्या कामाच्या कार्यक्षमतेवर आणि करिअरवर परिणाम होऊ शकतो. कासव आणि हिरवी रोपे सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही ऑफिसमध्ये खूप मेहनत करताय? पण त्याचे परिणाम दिसत नाहीयेत? तर त्याचे कारण तुमचे ऑफिस डेस्क असू शकते. वास्तूनुसार, एखादी व्यक्ती बहुतेक वेळ ज्या जागेत घालवते त्या जागेच्या ऊर्जेचा थेट परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर, निर्णयक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर होतो.

लोक त्यांच्या ऑफिस डेस्कवर ८ ते ९ तास घालवतात. त्यामुळे, तिथे ठेवलेल्या वस्तूंचा त्यांच्या करिअरवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया की तुम्ही तुमच्या ऑफिस डेस्कवर कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

जेवणाची ताटं ठेवू नका

वास्तूनुसार, ऑफिसच्या डेस्कवर जेवणाचं ताट ठेवणं अशुभ मानण्यात येतं. असं मानलं जातं की, कामाच्या ठिकाणी जेवण केल्याने तुमच्या विचार क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते. तसंत निर्णय घेण्यास अडचण येऊ शकते.

काटेरी वनस्पती

जर तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर निवडुंग किंवा इतर काटेरी वनस्पती असतील तर तुम्ही त्या ताबडतोब काढून टाकाव्यात. वास्तुशास्त्रानुसार, अशा वनस्पती तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा वाढवतात. याचा परिणाम ऑफिसच्या वातावरणावर आणि व्यक्तीच्या कामगिरीवर होऊ शकतो.

अनावश्यक वस्तू

ऑफिसच्या टेबलावर जुन्या फायली, अनावश्यक कागदपत्रं, गुंतागुंतीच्या तारा आणि अनावश्यक वस्तूंचा ढीग लावणं देखील योग्य नाही. यामुळे केवळ डेस्क अव्यवस्थित दिसत नाही, तर तुमच्या कामाची कार्यक्षमता आणि एकाग्रतेवरही परिणाम होतो. वास्तूनुसार, ऑफिसच्या डेस्कचा मध्यभाग नेहमी रिकामा आणि स्वच्छ असा

या गोष्टी मानल्या जातात शुभ

वास्तुशास्त्रानुसार, आपल्या ऑफिसच्या डेस्कवर कासवाची छोटी मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. हे स्थिरता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. हत्तीची छोटी मूर्ती ठेवल्याने एकाग्रता वाढते आणि करिअरमध्ये प्रगती होते, असंही वास्तूशास्त्र सांगतं. आपल्या डेस्कवर छोटी हिरवी रोपे देखील ठेवता येतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT