Nissan Magnite EZ Shift Saam Tv
लाईफस्टाईल

Nissan Magnite EZ Shift लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किती आहे किंमत

Nissan Magnite EZ Shift Features, Price and लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किती आहे किंमत

Satish Kengar

Nissan Magnite EZ Shift Features and Price:

वाहनात उत्पादक कंपनी Nissan ने आपली नवीन EZ Shift कार लॉन्च केली आहे. हे मॅग्नाइटचे ऑटोमॅटिक व्हर्जन आहे. याची किंमत त्याच्या मॅन्युअल मॉडेलपेक्षा 50 हजार रुपयांनी जास्त आहे.

कंपनीने या कारची प्रारंभिक किंमत 6.50 लाख रुपये ठेवली आहे. ग्राहक फक्त 11 हजार रुपये भरून ही कार बुक करू शकता. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

मिळेल 5 स्पीड गिअरबॉक्स

मिळालेल्या माहितीनुसार, कारचे ऑटोमॅटिक व्हर्जन चार ट्रिममध्ये सादर केले जाईल: XE, XL, XV आणि XV प्रीमियम. कारचे टॉप मॉडेल 8.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. यात क्लायमेट कंट्रोल आणि एलईडी हेडलॅम्प आहेत. कारमध्ये 336 लीटरची मोठी बूट स्पेस आहे. या नवीन कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल.  (Latest Marathi News)

कारमध्ये मिळणार 9.0-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

कारमध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे. कारमध्ये 9.0-इंचाची एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात टर्बो इंजिनचा पर्यायही आहे. या कारमध्ये सुरक्षेसाठी एडीएएस आणि एअरबॅगची सुविधा आहे. ADAS चालकाला चारही चाकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. कारचे पॉवरफुल इंजिन 98.63 पीएस पॉवर देते. ही कार 20 kmpl मायलेज देऊ शकते.

कारमध्ये मिळणार 8 रंग पर्याय

निसानच्या या कारमध्ये 9.0-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यामुळे तिला एक जबरदस्त लूक मिळतो. जपानी कार निर्माता कंपनी निसानने आपल्या कारमध्ये 8 रंगांचे पर्याय दिले आहेत. अलीकडेच कंपनीने आपली नवीन कार Nissan Magnite Kuro स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे. ही कार 8.27 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. कारचा टॉप व्हेरिएंट, Kuro XV Turbo CVT, 10.46 लाख एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT