Skin care, Skin care tips, Night skin care tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Night skin care : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हे लावा, मिनिटांत येईल ग्लो

चेहऱ्याची काळजी कशी घ्याल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपण दिवसभरात जितकी काळजी त्वचेची घेतो तितकीच काळजी आपल्याला झोपण्यापूर्वी देखील चेहऱ्याची घ्यायला हवी.

हे देखील पहा -

आपण दिवसभर धूळ व प्रदूषणसारख्या जागेत सतत वावरत असतो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो. आपल्याला चेहऱ्याची चमक टिकवून ठेवायची असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, रात्रीच्या वेळी त्वचेची दुरुस्ती होत असते व त्वचा निरोगी राहते. त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी आपण काही गोष्टींची विशेष काळाजी घ्यायला हवी. त्यासाठी झोपण्यापूर्वी काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्याला हवा. ज्यामुळे त्वचेवर साचलेली घाण व तेलकटपणा निघून जाण्यास मदत होईल व त्वचा पूर्णपणे कोरडी होईल. चेहऱ्याला मेकअप केला असेल तर ऑइल क्लीन्झरने चेहरा स्वच्छ करायला हवा.

२. झोपण्यापूर्वी कोरफड जेल त्वचेला लावल्यास ती तेलकट होणार नाही. त्याचप्रमाणे त्वचेवर येणारे मुरुमांच्या समस्या कमी होतील. त्यामुळे त्वचा चमकदार व तजेलदार बनेल.

३. चेहऱ्यावर काकडीचा रस लावल्यास निस्तेज व कोरड्या त्वचेपासून (Skin) आपल्याला सुटका मिळेल. तसेच झोपण्यापूर्वी काकडीच्या रसात व्हिटॅमिन ई ची तेलाचे काही थेंब व हळद घालून चेहऱ्याला हलका मसाज करावा. त्यानंतर चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवावा.

४. केशरचे आरोग्यासाठी अनेक फायदे (Benefits) होतात. दूधात केशरच्या २ ते ३ काड्या भिजवून त्यात हळद घाला. कापसाच्या बोळ्याने रात्री चेहऱ्यावर लावून तसेच ठेवा. सकाळी चेहरा धुतल्यास चमकण्यास मदत होईल.

५. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्या. चेहऱ्यावर कच्च्या दुध लावून हलक्या हाताने मसाज करा. असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT