Why do I wake up starving in the night, Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : रात्री झोपेत अचानक भूक लागते ? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान !

रात्रीच्यावेळी अचानक भूक लागते अशावेळी काय करायला हवे ?

कोमल दामुद्रे

Why do I wake up starving in the night : रात्रीचे जेवन केल्यानंतरही आपल्याला अचानक मध्यरात्री भूक लागते अशावेळी आपण जंक फूड, चिप्स, आइस्क्रिम खाण्यास प्राधान्य देतो परंतु, हे कितपत योग्य आहे हे कोणालाच माहित नाही.

रात्रीच्या (Night) वेळी भूक लागल्यावर त्याला नाईट इटिंग सिंड्रोम (NES) हा निद्रानाशाशी संबंधित एक खाण्याचा विकार म्हणून ओळखले जाते. NES असलेले लोक अनेकदा मध्यरात्री जेवायला उठतात. हे सहसा रात्रभर अनेक वेळा होऊ शकते. दीर्घकाळ उपचार न केल्यास लठ्ठपणा येऊ शकतो. या सिंड्रोमसह मधुमेह (Diabetes) आणि त्यामुळे उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. (Night Eating Syndrome In Marathi)

WebMd नुसार, अंदाजे १०० पैकी एक व्यक्ती NES मुळे ग्रस्त आहे. तुम्ही लठ्ठ असाल तर हा आजार होण्याची शक्यता १० टक्क्यांपैकी १ टक्का आहे. याशिवाय, हे अनुवांशिक कारणांमुळे देखील होते. NES असलेल्या लोकांमध्ये नैराश्य किंवा चिंतेची प्रकरणे अधिक सामान्य आहेत.

परंतु, जर तुम्हाला रात्री खाण्याची सवय असेल आणि ती सोडवायची असल्यास आपण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच, यात काही अँटीडिप्रेसंट औषधे, काही थेरीपी आहेत ज्यामुळे झोपेच्या आहाराचे चक्र सुधारण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. परंतु, याची योग्य लक्षणे कोणते याविषयी जाणून घेऊया.

NES असलेल्यांना आठवड्यातून चार वेळा निद्रानाश होतो. ते कित्येक आठवडे किंवा महिने रात्री खाण्यासाठी जागे होतात. पुन्हा झोप येण्यासाठी पोट भरले असले पाहिजे असे त्यांना वाटते.

हा विकार असलेले लोक त्यांच्या रोजच्या जेवणाच्या २५% पेक्षा जास्त प्रमाणात रात्री खातात. ते रात्री उशिरा, झोपण्यापूर्वी किंवा दोन्ही वेळी खातात. NES असलेले बरेच लोक रात्रभर लहान जेवण किंवा स्नॅक्स खातात. त्यांना सहसा जास्त कॅलरी, कार्बोहायड्रेट किंवा साखर असलेले अन्न हवे असतात.

नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या स्थिती अनेकदा NES सोबत असतात. NES असलेल्या लोकांना असे वाटते की, ते काय खातात यावर त्यांचे नियंत्रण नाही. ज्यामुळे ते दीर्घकाळ चिंतेत असतात.

हायपरफॅगिया हा (तीव्र भूक आणि जास्त खाणे) संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी उद्भवतो. NES असलेले लोक नाश्ता करत नाहीत. त्याचबरोबर काहींना दुपारपर्यंत भूक लागत नाही.

तुम्ही NES विरुद्ध संरक्षण करू शकत नाही. पण तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शांत झोप घेण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामध्ये निरोगी खाणे, झोपण्यापूर्वी कॅफीन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे टाळणे, दिवसा नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली यांचा समावेश अवश्य करायला हवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT