New Year Investment
New Year Investment Saam Tv
लाईफस्टाईल

New Year Investment Plan: 'या' 4 बँका FD वर देताय जास्त रिटर्नस, नवीन वर्षात करा येथे गुंतवणूक

कोमल दामुद्रे

New Year Investment : आधुनिक काळात गुंतवणूकदारांना अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आरबीआय रेपो रेटमध्ये अनेक वेळा वाढ झाल्यामुळे लोक बँक एफडीमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. बँक एफडीच्या व्याजदरात जास्त वाढ झाल्यामुळे अनेक सरकारी (Government) योजनांपेक्षा मुदत ठेवींवर जास्त व्याज दिले जात आहे. येथे अशा चार बँकांची माहिती आहे, ज्या तुम्हाला FD वर अधिक व्याज देत आहेत.

या चार बँका ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सुपर ज्येष्ठ नागरिकांनाही अधिक व्याज देत आहेत. 60 वर्षांवरील लोकांचे ज्येष्ठ नागरिक म्हणून वर्गीकरण केले जाते आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणून वर्गीकृत केले जाते. या लोकांना फिक्स्ड डिपॉझिटवर 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

1. आरबीएल बँक एफडी

बँक सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 8.30 टक्क्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 50 टक्के अधिक व्याज देत आहे. तर ही बँक अति ज्येष्ठ नागरिकांना ०.७५ टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. म्हणजेच 80 वर्षांचे लोक 8.45 टक्क्यांपर्यंत व्याज घेऊ शकतात.

2. इंडियन बँक एफडी

ही बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 0.75 टक्के अधिक व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अधिक व्याज देत आहे.

Fixed Deposit

3. युनियन बँक ऑफ इंडिया

ही बँक (Bank) सुपर ज्येष्ठांना मुदत ठेवींवर ८.०५ टक्के व्याज देत आहे. हे व्याज 800 दिवसांपासून ते 3 वर्षांच्या एफडीवर दिले जात आहे. हे व्याजदर 1 डिसेंबर 2022 पासून लागू आहेत.

4. पंजाब नॅशनल बँक

या बँकेबद्दल बोलायचे झाले तर, ही बँक सुपर सीनियर्सना मुदत ठेवींवर 0.80% अतिरिक्त व्याज देत आहे. PNB 666 दिवसांच्या कालावधीवर सुपर ज्येष्ठ नागरिकांना 8.10 टक्के व्याज देत आहे. हे दर 12 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. पाच वर्षांच्या एफडीवर हा व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के व्याज देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Dabholkar Update | दाभोलरांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरु,विरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता!

ITR: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! एक चूक अन् सगळे पैसे अडकणार

Mumbai Local : लोकल ट्रेनमधील धम्माल मस्ती रुपेरी पडद्यावर दिसणार, 'मुंबई लोकल'चा पोस्टर रिलीज

SSC Exam Fee Hike| दहावीची परीक्षा देणं महागणार, परीक्षा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ

Dark Chocolate For Heart : डार्क चॉकलेट खा आणि हार्ट अटॅकपासून निश्चिंत रहा; वाचा आरोग्यासाठी अन्य फायदे

SCROLL FOR NEXT