New Year Party 2024 In India Saam Tv
लाईफस्टाईल

कमी बजेटमध्ये करा New Year Celebration 2024, ही ठिकाणे ठरतील बेस्ट!

New Year Party 2024 In India : ३१ डिसेंबरला जगभरात अनेक ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले जाते. या वेली तुम्हालाही कुठे फिरायला जायचे असेल. तर भारतातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जेथे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन धूमधडक्यात साजरा होते.

कोमल दामुद्रे

Best Places To Celebrate New Year In India:

डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होईल. अनेकांना नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायचे असते. यासाठी अनेक लोक फिरण्याचा प्लान देखील करतात.

३१ डिसेंबरला जगभरात अनेक ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन (Celebration) केले जाते. या वेली तुम्हालाही कुठे फिरायला जायचे असेल. तर भारतातील (India) काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जेथे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन धूमधडक्यात साजरा होते. कमी बजेटमध्ये तुम्ही नवीन वर्षाचा (New Year) आनंद लुटू शकता. जाणून घेऊया त्या ठिकांणाबद्दल सविस्तर

1. उदयपूर

राजस्थानमधील उदयपूर शहराला लेक सिटी म्हणूनही ओळखले जाते. ३१ डिसेंबरला इथे मोठी जत्रा आयोजित केली जाते. या काळात संपूर्ण उदयपूरमधील किल्ले आणि राजवड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. तसेच रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या भिंतीवर होणारा लाईट अँड साउंड शो देखील बघायला मिळतो.

2. गोवा

नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला सुंदर फोटोज आणि आठवणींनी करायची असेल तर गोव्याला भेट देऊ शकता. गोव्याचे नाईट लाईफ आणि पार्टी खूप फेमस आहे. ख्रिसमसपासून या ठिकाणी सेलिब्रेशन सुरु होते. येथे तुम्ही ट्रेन देखील सहज प्रवास करु शकता.

3. गोकर्ण

कर्नाटकातील गोकर्ण येथे तुम्ही नवीन वर्ष साजरे करु शकता. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. येथे अनेक बीच आहेत जिथे पार्टी आणि न्यू इअर सेलिब्रेशन करता येते.

4. मनाली आणि शिमला

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला गुलाबी थंडीचा आनंद लुटायचा असेल तर मनाली आणि शिमलाला भेट देऊ शकता. तसेच येथे पूल आणि बीच पार्टी करता येईल. मनालीमध्ये स्कीइंग आणि ट्रेकिंगचा आनंद लुटता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT