Year 2024 House Purchase Muhurat Saam Tv
लाईफस्टाईल

Year 2024 House Purchase Muhurat : नवीन वर्षात घर खरेदी करताय? जानेवारी महिन्यातील शुभ मुहूर्त पाहा

Gruha Pravesh 2024 : तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर हिंदू पंचागानुसार २०२४ च्या पहिल्या महिन्यात काही शुभ मुहूर्त तयार होत आहे. या शुभ मुहूर्तानुसार घर खरेदी केले तर घराची समृद्घी वाढते.

कोमल दामुद्रे

House Shubh Muhurat 2024 :

नवीन वर्षात आपल्या प्रत्येकाचा नवा काही तरी संकल्प असतो. कुणाला घर खरेदी करायचे असते तर कुणाला कार हे घेण्यामागे आपण अधिक मेहनत करावी लागते. हिंदू धर्मात तिथी आणि मुहूर्ताला खूप महत्त्व आहे.

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहाणे देखील गरजेचे आहे. असे मानले जाते की, कोणतेही काम शुभ काळात केले तर ते शुभ आणि फलदायी ठरते. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर हिंदू पंचागानुसार २०२४ च्या पहिल्या महिन्यात काही शुभ मुहूर्त तयार होत आहे. या शुभ मुहूर्तानुसार घर (Home) खरेदी केले तर घराची समृद्धी वाढते. जानेवारी २०२४ च्या पहिल्या महिन्यात हिंदू कॅलेडनरनुसार घर खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी, जाणून घेऊया.

वर्षाच्या पहिल्या महिन्यात हिंदू पंचागानुसार २०२४ मध्ये घर खरेदीसाठी एकूण ३ शुभ मुहूर्त आहेत.

  • गुरुवार - ११ जानेवारी २०२४

  • घर खरेदीसाठी शुभ मुहूर्त - सकाळी ७.१५ ते सायंकाळी ५.३९ मिनिटे

  • तिथी- अमावास्या, नक्षत्र - पूर्वाषाढा

  • गुरुवार - २५ जानेवारी, २०२४

  • घर खरेदीसाठी शुभ मुहूर्त - सकाळी ७.१३ ते ८.१६

  • तिथी - पौर्णिमा, नक्षत्र - पुनर्वसू

  • शुक्रवार - २६ जानेवारी २०२४

  • घर खरेदीसाठी शुभ मुहूर्त (Shubh Muhurat) - सकाळी १०.२८ मिनिटे तर २७ जानेवारी शनिवार सकाळी ०७.१२ मिनिटे

  • तिथी - प्रतिपदास द्वितीया, नक्षत्र - आश्लेषा

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT