अठरा महापुराणांमध्ये गरुड पुराणाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या पुराणात भगवान विष्णू आणि पक्षिराज गरुड यांच्यात झालेल्या संवादाचे वर्णन आढळतं. शास्त्रांनुसार गरुड पुराण हे विष्णूंचेच एक अंग मानलं जातं. यात जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांचं विस्तृत वर्णन केलं गेलंय.
याशिवाय मानवी जीवनाशी संबंधित अनेक गूढ रहस्यंही या पुराणात मांडली आहेत. ज्यांचा अवलंब केल्यास मनुष्याचं जीवन आनंदी आणि सुखी होऊ शकते, असं मानलं जातं. गरुड पुराणातील शिकवणीचं पालन केल्यास माणसाला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.
या पुराणात काही गोष्टींबाबत विशेष उल्लेख आहे की, त्या कामांना कधीही अपूर्ण सोडू नये. कारण, असं केल्यास मनुष्याला नरकासमान यातना भोगाव्या लागू शकतात. चला जाणून घेऊया, कोणती ती तीन कामं आहेत.
गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितलं आहे की, अग्नीला कधीही दुर्लक्षित करू नये. कुठे आग लागल्यास तिचं तत्काळ निवारण करणं आवश्यक आहे. कारण, अगदी छोट्याशा ठिणगीनेही मोठा अनर्थ घडू शकतो. निष्काळजीपणामुळे केवळ धन-संपत्तीच नाही, तर जीवनालाही मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून आग विझवूनच सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी.
छोटा असो वा मोठा, कोणताही आजार हलक्यात घेऊ नये. कधी कधी साधीशी वाटणारी व्याधी गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे शरीरात अस्वस्थता जाणवताच योग्य वेळी उपचार करणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे, उपचार अर्धवट सोडणं टाळावं. रोग पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत औषधोपचार सुरू ठेवणं गरजेचं आहे. गरुड पुराणात या बाबीवर विशेष भर दिला आहे.
गरुड पुराणानुसार, कर्ज ठेवणं किंवा परतफेड न करणं हे जीवनात संकटं ओढवून आणणारं असतं. घेतलेलं उधार वेळेवर न फेडल्यास माणसाच्या कीर्तीवर डाग लागतो तसंच घरातील सुख-शांतीही हरवते. म्हणून घेतलेलं कर्ज किंवा उधार ठरलेल्या वेळेत चुकतं करणंच योग्य ठरतं. जे व्यक्ती हे करत नाहीत, त्यांना नरकासमान यातना भोगाव्या लागतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.