आजकाल मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्ट असतात ज्या प्रत्येकजण वर-खाली करण्यास वापरतात, मात्र काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे लिफ्ट बिघडते. लिफ्ट कधी खराबच होते, कधी लाईट गेली की मध्येच अडकते, तर कधी लाईट पुन्हा पुन्हा गेल्याने बंद होते त्यामुळे लिफ्टमध्ये प्रवास करण्यासाठी लोक घाबरतात.
लिफ्ट बंद पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. जर तुम्ही कधी लिफ्टमध्ये अडकलात तर या गोष्टींची खबरदारी घ्या. आणि लिफ्ट बंद होण्याची भीती बाळगू नका तर या टिप्स नक्कीच फॉलो (Follow) करा.
लिफ्ट बंद झाल्यावर चुकूनही या गोष्टी करू नका.
घाईत वारंवार बटण दाबू नका.
अंधार पडल्यावर घाबरू नका, लगेच मोबाईलचा (Mobile) लाईट चालू करा.
स्वत: दार उघडण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला दुखापत होऊ शकते..
हात किंवा पाय वापरून लिफ्ट बंद करण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न करू नका.
ओव्हरलोड करू नका कारण प्रत्येक लिफ्टला वजन सहन करण्याची मर्यादा असते.
लिफ्टचे गेट व्यवस्थित बंद होत आहे की नाही ते तपासा. गेट नीट बंद केले नाही तरी लिफ्ट अडकते. आग किंवा भूकंप झाल्यास लिफ्टचा अजिबात वापर करू नका.
अनेक वेळा लोक एकाच वेळी दोन बटणे दाबतात, ज्यामुळे तांत्रिक बिघाड होऊ शकतो किंवा लिफ्ट अडकू शकते.
लिफ्टमध्ये असलेली बटणे -
अनेक ठिकाणी लिफ्टच्या कीबोर्डवर इतकी बटणे असतात की लोक गोंधळून जातात. साधारणपणे, लिफ्टमध्ये टॉप-डाउन म्हणजेच कॉल (Call) बटणे नंबरिंग बटणे असतात.
अप अॅरो बटण -
जेव्हा तुम्हाला तुमच्या वरच्या मजल्यावर जायचे असेल तेव्हा तुम्ही वरचे बाणाचे बटण दाबावे.
डाउन अॅरो बटण -
तुम्हाला सध्याच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर जायचे असेल, तर तुम्ही डाउन अॅरो बटण दाबावे.
M बटण -
जर लिफ्टमध्ये एम बटण असते ते मेझानाइनशी (Mezzanine) संबंधित आहे. M बटण दाबल्याने तुम्हाला मेझानाईन मजल्यावर नेले जाईल. हा मजला सर्वात खाली असतो. मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये तुम्हाला अशी बटणे दिसतात.
C बटण -
Concourse शी संबंधित आहे. लिफ्टच्या इमारतींमध्ये हे बटण कमी वापरले जाते, तर रेल्वे स्थानक, मेट्रो स्टेशन किंवा मोठ्या इमारती, रुग्णालयांमध्ये जास्त वापरले जाते. कॉन्कोर्स म्हणजे प्रवेशद्वार मजला, जिथे खूप मोठा हॉल असतो.
वास्तविक, विमानतळ किंवा मेट्रो स्थानकात प्रवेश करताच जी मोठी रिकामी जागा असते आणि तेथे बरेच लोक असतात, त्याला कॉन्कोर्स म्हणतात. RC बटण तळमजला आणि पहिला मजला दोन्ही समान आहेत. यासाठी लिफ्टमध्ये 'RC' बटण वापरले जाते. जेव्हा तुम्ही फ्रेंच लिफ्टमध्ये असता तेव्हा तुम्हाला 'ग्राउंड फ्लोअर' साठी 'G' बटणाऐवजी Rez-De-Chaussee (RC) बटण दिसले.
तज्ज्ञांच्या मते, लिफ्ट बंद असताना ती आतून उघडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. लिफ्ट कधी बंद पडल्यास, त्यात पॉवर बॅकअप असतो. जो ऑटो-जनरेटेड सिस्टमद्वारे चालवला जातो. यानंतर लिफ्ट पुढच्या किंवा मागील मजल्यावर पोहोचते आणि गेट आपोआप उघडतात. गेट तरीही उघडत नसल्यास, आपण तेथे असलेले Emergency बटण किंवा अलार्म वापरू शकता. पण आतून गेट उघडण्याचा प्रयत्न करू नका.
जेव्हा लोक घाबरतात तेव्हा ते लिफ्टची सर्व बटणे एकाच वेळी दाबतात जेणेकरून लिफ्ट सुरू होईल, परंतु असे केल्याने काहीही होणार नाही. त्या वेळी तुम्ही स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला मदत मिळण्याची वाट पाहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.