Never do this after or before meal time, Health Care Tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

जेवल्यानंतर ही कामे लगेच करु नका

अनेकवेळा सकस आहाराचा अवलंब करूनही आपण अनेक आजारांना बळी पडतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या शरीरासाठी पुरेपुर आहार घेणे गरजेचे आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आपण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. अनेकवेळा सकस आहाराचा अवलंब करूनही आपण अनेक आजारांना बळी पडतो. (Health Care Tips in Marathi)

हे देखील पहा -

चांगल्या जीवनशैलीसाठी आपण आपल्या आहारात सतत बदल करत असतो. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. अनेक प्रयत्न करुनही आपल्याला आरोग्याशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. जेवण्यापूर्वी किंवा नंतर चुकीच्या काही सवयींमुळे आपण आजारी पडतो. अशावेळी आपण कोणत्या चुका टाळायला हव्या हे पाहूया.

१. पाणी प्याल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अंत्यत उपयुक्त ठरते परंतु, चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी (Water) प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यास अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

२. अनेकदा आपण जेवताना पॅन्टची पट्टा सैल करतो. हे अगदी सामान्य असले तरी यामुळे आपली समस्या वाढू शकते. पट्टा सैल केल्यामुळे, पोटाभोवती निर्माण होणाऱ्या दबावापासून आपल्याला आराम मिळतो व अशावेळी आपण अधिक जेवतो. वजन वाढण्यासोबतच यामुळे अपचनाचा त्रासही होऊ शकतो.

३. तंबाखूचे सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. काही लोक जेवल्यानंतर किंवा जेवताना तंबाखूचे सेवन करतात. असे केल्याने पोटाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

४. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण इतके थकतो की, जेवल्यानंतर आपल्याला झोप येऊ लागते. आपल्याला रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची किंवा पडून राहण्याची सवय असेल, तर ती टाळणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने पोटाचे आजार आणि लठ्ठपणाच्या तक्रारी सुरू होतात.

५. फळांचे (fruit) सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असले तरी दुपारचे किंवा रात्रीचे (Night) जेवण केल्यानंतर फळे खाणे टाळावे. जेवल्यानंतर लगेच फळे खाल्ल्यास त्यातील पोषक तत्वे शरीराला मिळत नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT