NTA ने NEET UG 2026 फेरपरीक्षेची प्रवेशपत्रे जारी केली आहेत.
प्रवेशपत्रे neet.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
NEET UG 2026 ची फेरपरीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) NEET UG 2026 च्या पुनर्परीक्षेबाबत एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची अॅडमिट कार्ड्स जारी केली आहेत. ही प्रवेशपत्रे NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर (neet.nta.nic.in) उपलब्ध आहे. विद्यार्थी त्यांच्या लॉगिन तपशीलांचा वापर करून ती डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना नियमितपणे संकेतस्थळ तपासण्याचा आणि वेळेवर त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सूचना देण्यात आली आहे.
NEET UG पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र (admit card) डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
यानंतर, अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा.
लॉग इन केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या.
शेवटी, प्रवेशपत्र (admit card) डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
NEET UG प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख ही सर्व आवश्यक माहिती असते. यासह त्यावर परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ताही दिलेला असतो, जेणेकरून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर सहजपणे पोहोचू शकतील. प्रवेशपत्रावर 'रिपोर्टिंगची वेळ' (परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची वेळ) केलेली असते. जेणेकरून उमेदवार वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचू शकतील. यात परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या सूचनांचाही समावेश असतो.
परीक्षेच्या दिवशी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी या सूचना काळजीपूर्वक वाचणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. परताव्याबाबत (रिफंड) काही समस्या उद्भवू नयेत यासाठी, प्रवेशपत्र जारी होण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या बँक खात्याचा तपशील तपासून पहावा, असा सल्लाही NTA ने दिला आहे.
उमेदवारांनी NEET UG 2026 परीक्षेच्या दिवशी वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. परीक्षा केंद्रावर प्रवेश सकाळी ११:०० वाजता सुरू होईल. तर प्रवेशद्वारे दुपारी १:३० वाजता बंद होतील. यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेवर पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुपारी १:४० वाजेपर्यंतच अंतिम प्रवेश दिला जाईल. त्यानंतर प्रवेश पूर्णपणे बंद केला जाईल. परीक्षा दुपारी २:०० ते सायंकाळी ५:१५ या वेळेत घेतली जाणार आहे.
NTA ने यावेळी परीक्षा प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल करम्यात आलेत. आता परीक्षेचा कालावधी वाढवून १९५ मिनिटे करण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना आता पूर्वीपेक्षा अधिक वेळ मिळणार आहे. यासह विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रश्नपत्रिकेत कच्च्या कामासाठी (rough work) चार पाने दिली जातील. यात दोन सुरुवातीला आणि दोन शेवटी देण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.