Kitchen Cleaning  Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Cleaning : किचनची साफसफाई करायची आहे ? 'या' टिप्स फॉलो करा, मिनिटांत होईल काम!

महिलांसाठी घरातील स्वयंपाक घर खूप महत्त्वाचा भाग असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kitchen Cleaning : महिलांसाठी घरातील स्वयंपाक घर खूप महत्त्वाचा भाग असतो जिथे त्या दिवसातून जास्तीत जास्त वेळ तिथे घालवत असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वयंपाक घरात काम करत असतात.

काही स्त्रिया सकाळी स्वयंपाक घरातील कामे करून बाहेर ऑफिसला (Office) कामाला जातात आणि तिथून पुन्हा येऊन स्वयंपाक घरात काम करत असतात.स्वयंपाकघराला आपल्या इथे पवित्र समजले जाते त्यामुळे ते स्वच्छ आणि टीपटाप ठवणे गरजेचे आहे.

तसेच किचन (Kitchen) चा एवढा वापर केल्याने स्वयंपाक घर घाण होते तिथे खूप सारे बॅक्टेरिया असतात ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे घरातील लोकांना आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वयंपाक घर साफ करताना तुम्ही खालील टिप्सचा वापर करून सोप्या पद्धतीने किचन स्वच्छ करू शकता.

बेंकिंग सोडा -

किचन स्वच्छ करण्यासाठी बेंकिंग सोडा सोपा पर्याय आहे. स्वयंपाक घरातील डाग काढण्यासाठी हे उपयुक्त आहे. स्वयंपाक घरातील सिंक,ग्रिल,नाले, ओवेहेन,आयक्रोवेव्ह या सर्व वस्तूचा चिकटपणा दुर करण्यासाठी बेंकिंग सोडा चा वापर केला पाहिजे.

डिश धुण्याचा साबण -

एका स्प्रे बॉटलमध्ये एक कप कोमट पाणी टाकून त्यात डिश वॉशिंग साबणाचे ३/४ थेंब मिसळा. स्प्रे बॉटलचा वापर करून तुम्ही स्वयंपाक घरातील गॅस आणि सर्व पृष्ठभागावर फवारणी करून काही मिनिटांनी पुसून टाका ते खूप लवकर साफ करण्यास मदत होईल.

लिंबू आणि व्हिनेगर -

व्हिनेगर चा वापर स्वयंपाक घरातील बॅक्टेरिया मारण्यासाठी करू शकता. लिंबू चा वापर तिखट वास घालवण्यासाठी करू शकता. लिंबू व्हिनेगरचे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून किचन कॅबिनेटवर स्प्रे करा पाच दहा मिनिटांनी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.

तेल आवश्यक -

तुमच्या आवडीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब कापसाच्या गोळ्यावर टाकुन डस्टबिन मध्ये टाका त्यामुळे डस्टबिनचा वास येणार नाही आणि तुमचे घर फ्रेश राहील. कीटक दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT