Heart Veins Blockage Signs saam tv
लाईफस्टाईल

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Jaw Pain Blocked Arteries Symptom: हृदयविकाराचा झटका म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर छातीत तीव्र वेदना होण्याचं चित्र उभे राहतं. पण, अनेकदा हृदयविकाराची लक्षणे अस्पष्ट आणि शरीराच्या इतर भागांमध्ये दिसतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • छातीत वेदना हृदयविकाराचे सामान्य लक्षण

  • श्वास लागणे हे रक्तपुरवठा कमी झाल्याचे संकेत

  • थकवा आणि अशक्तपणा दुर्लक्षित करू नये

हृदयविकार म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर छातीतील तीव्र वेदना समोर येतात. मात्र याचप्रमाणे इतरंही लक्षण असतात जी तुम्हाला हृदयविकाराचे संकेत देतात. यामध्ये छातीत दडपण जाणवणं, जळजळ होणं किंवा छातीत घट्टपणा जाणवणं इत्यादी.

हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं काय आहेत?

आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम हृदयाकडून होत असतं. मात्र ज्यावेळी हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळा येतो त्यावेळी ती स्थिती प्राणघातक ठरू शकते. याला कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हृदय ब्लॉकेज असं म्हटलं जातं. ज्यावेळी हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. हे संकेत काय आहेत ते जाणून घेऊया.

छातीत होणाऱ्या वेदना

जर तुम्हाला छातीत वेदना जाणवत असतील तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे छातीत होणाऱ्या वेदना या हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्याचं सामान्य लक्षण मानलं जातं. याशिवाय छातीत दडपण, जळजळ होत असेल तर ते अँजायनाचं लक्षण असतं.

श्वास घेण्यास त्रास

जर तुम्हाला थोडं चालल्यावर किंवा जिना चढल्यावर श्वास लागत असेल तर हे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही याचे संकेत असू शकतात. हे हृदय ब्लॉकेजचे सुरुवातीची लक्षणं असू शकते. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

लवकर थकवा जाणवणं

जर तुम्हाला रोजची काम करताना थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल सावध व्हा. याचं कारण तर याचा अर्थ हृदय शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवू शकत नाही. हेही हृदय ब्लॉकेजचं महत्त्वाचं लक्षण आहे.

हात, मान किंवा जबड्यामध्ये वेदना

अनेकदा हृदयविकाराच्या वेदना शरीराच्या इतर भागांमध्येही जाणवतात. यामध्ये डावा हात, पाठ किंवा जबडा यांचा समावेश असू शकतो. अनेकदा या वेदना सामान्य मसल पेन समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र हे गंभीर ठरू शकतं.

हृदयाच्या ठोक्यात अनियमितता

जर तुमचं हृदय अचानक जोरात धडधडायला लागलं किंवा तुम्हाला गरगरायला लागलं तर हे लक्षण हलक्यात घेऊ नका. हृदयाच्या ठोक्यातील अनियमितता देखील हृदय ब्लॉकेजचा इशारा असू शकणार आहे.

हृदय ब्लॉकेजचा धोका वाढवणारे घटक

  • हाय कोलेस्ट्रॉल

  • उच्च रक्तदाब

  • धूम्रपान

  • मधुमेह

  • लठ्ठपणा

  • शारीरिक हालचालींचा अभाव

हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात?

छातीत वेदना, थकवा, श्वास लागणे दिसते.

डावा हात दुखणे हृदयाशी संबंधित असते का?

होय, डावा हात दुखणे हे लक्षण असते.

हृदय ब्लॉकेजचा धोका कोणामुळे वाढतो?

कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान यामुळे धोका वाढतो.

श्वास घेण्यास त्रास झाल्यास काय करावे?

तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदय ठोके अनियमित झाल्यास काय संकेत असतो?

हे हृदय ब्लॉकेजचे गंभीर लक्षण असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT