लाईफस्टाईल

Navratri Wishes 2025: तू गं दूर्गा, तू भवानी..., शारदीय नवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Navratri 2025 Marathi Wishes: यंदाची शारदीय नवरात्री खास आहे. देवीच्या ९ रुपांचे पूजन होणार आहे. यावेळी एक तिथी दोन दिवस असल्यामुळे घटस्थापना १० दिवस चालणार आहे. प्रियजनांना या नवरात्रीच्या खास शुभेच्छा द्या.

Dhanshri Shintre

आई अंबाबाई दुर्गामाता या नवरात्रीत सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. यंदा तृतीया तिथी दोन दिवस असल्याने नवरात्रीचा उत्सव १० दिवसांचा असेल. देवी गजावरून आगमन करत असून सुख, समृद्धी आणि आनंद आपल्यासोबत घेऊन येत आहे. घटस्थापना करणाऱ्यांचे विसर्जन दसऱ्याला होईल, तर रावणाचे दहनही दशमीला केले जाईल. गरबा, दांडिया आणि भक्तीच्या रंगात हा उत्सव साजरा केला जाईल. भक्त आपल्या प्रियजनांना, मित्र आणि कुटुंबाला या पवित्र नवरात्रीच्या शुभेच्छा खास संदेशांद्वारे पाठवू शकतात.

घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या

शारदीय नवरात्र उत्सवाच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

नवरात्री म्हणजे

न – नवचेतना देणारी

व – विघ्नांचा नाश करणारी

रा – राजसी मुद्रा असलेली

त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी

नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

नवरात्रीचे नऊ दिवस,

सण हा मांगल्याचा असे..

देवीची नऊ रूपे पाहून,

मन तिच्याच ठायी वसे.

नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

घटस्थापना घटाची,

नवदुर्गा स्थापनेची,

आतुरता आगमनाची,

आली पहाट नवरात्र उत्सवाची..

नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई झाला बिझनेसमन; मुंबईत सुरू केलं रेस्टॉरंट, पाहा पहिली झलक

Government Scheme: महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१००००, नेमकी योजना आहे तरी काय?

Bank Rules: नवरा-बायकोला एकाच ठिकाणी नोकरीवर बंदी, राज्य सहकारी बँकेने का घेतला निर्णय?

Honeymoon Destination : जोडीदारासोबत क्वालिटी टाइम हवाय? भारतातील 'हा' रोमँटिक स्पॉट ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT