Sabudana Puri Saam TV
लाईफस्टाईल

Sabudana Puri : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उपवासाला बनवा साबुदाणा पुरी; वाचा पौष्टिक रेसिपी

Navratri Special Sabudana Puri Recipe : साबुदाणा खिचडी ऐवजी बनवा साबुदाणा पुरी. वाचा सिंपल आणि सोपी रेसिपी. ही रेसिपी तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Ruchika Jadhav

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीमध्ये अनेक व्यक्ती उपवास करतात. उपवासाला बऱ्याच व्यक्ती झटपट तयार होणारी खिचडी खातात. खिचडी चवीला छान लागते आणि पोटही भरते. मात्र आता सलग नऊ दिवस खिचडी खाणे जरा कठीण आहे. तसेच सतत उपवासात तुम्ही सुद्धा खिचडी खाऊन बोर झाले असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर आणि हटके रेसिपी आणली आहे.

उपवासाला तुम्ही याआधी कधीही ही डिश खाल्ली नसेल. आज आपण साबुदाणा पुरी कशी बनवायची याची माहिती जाणून घेणार आहोत. साबुदाण्याचे आजवर तुम्ही वडे आणि सिंपल खिचडी खाल्ली असेल. अशात आजची उपवासाची पुरी तुमच्या घरात प्रत्येक व्यक्तीला आवडेल. तसेच लहान मुलं आणि ज्यांचा उपवास नाही त्यांना देखील ही पुरी नक्की आवडेल.

साहित्य

साबुदाणा - १ कप

सैंधव मीठ - चविनुसार

जीरे - १ चमचा

अद्रक-लसुण पेस्ट - १ चमचा

बटाटे - २

मिरची

तेल - तळण्यासाठी

कृती

सर्वात आधी एका पॅनमध्ये सर्व साबुदाणे टाकून मंद गॅसवर खमंग भाजून घ्या. साबुदाणे भाजले की मिक्सरला ते बारीक करून घ्या. साबुदाणे मिक्सरला छान बारीक होतील. साबुदाणे बारीक झाले की ते पुन्हा एका चाळणीने चाळून घ्या. साबुदाण्याची छान बारीक पावडर होणे महत्वाचे आहे.

पुढे एका भांड्यात बटाटे उकडवून घ्या. बटाटे मस्त उकडले की स्मॅशर किंवा हाताच्या मदतीने ते अगदी बारीक चुरून घ्या. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करा. मीठ मिक्स केल्यावर पुढे जीरे, अद्रक लसुण पेस्ट आणि मिरची एकत्र मिक्स करून घ्या. असे करत पुढे पाण्याचा थोडा हात घेऊन याचे छान बारीक मिश्रण तयार करून घ्या.

त्यानंतर पुढे तयार कणीकचे छोटे छोटे गोळे करा आणि पुरीच्या आकाराने लाटा. तुम्ही याची एक मोठी पोळी बनवून मोठ्या वाटीच्या सहाय्याने देखील पुरी करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पुरी कापून झाल्यावर पुढे गरमागरम तेलात पुरी तळून घ्या. अशा पद्धतीने पुरी बनवल्यास ती टम्म फुलते आणि चविष्ट लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT