यंदाच्या नवरात्रोत्सवाला अवघे १० ते १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. बाजारात अनेक मूर्तीकार देवीची सुबक मूर्ती घडवत आहेत. रेणुका माता, एकवीरा देवी अशा विविध रुपांत देवी घराघरामध्ये विराजमान होते. काही व्यक्तींच्या घरी देवीसाठी घटस्थापना केली जाते. नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव असतो. मात्र यंदाची नवरात्री ९ नाही तर १० दिवसांची आली आहे.
यंदा २०२४ मध्ये आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने शारदीय नवरात्र १० दिवसांची असल्याचं पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी म्हटलं आहे. ३ ऑक्टोंबर रोजी घटस्थापना असून १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आणि सरस्वती विसर्जन आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रीचा उत्सव तब्बल १० दिवस चालणार आहे.
३ ऑक्टोबरला घटस्थापना झाल्यावर ४ ऑक्टोबर चंद्रदर्शन त्यानंतर ६ ऑक्टोबरला विनायक चतुर्थी ७ ऑक्टोबरला ललिता पंचमी आहे. पुढे ८ तारखेला सेवादास महाराज यात्रा आष्टा आहे. ९ ऑक्टोबरला सरस्वती आवाहन आहे. तर १० तारखेला महाल्क्ष्मी पूजन आणि ११ ला दुर्गाष्टमी तसेच १२ ला दसरा आणि सरस्वती विसर्जन आहे.
२०२५ मध्ये सोमवार २२ सप्टेंबर
२०२६ मध्ये रविवार ११ ऑक्टोबर
२०२७ मध्ये गुरुवार ३० सप्टेंबर
२०२८ मध्ये मंगळवार १९ सप्टेंबर
२०२९ मध्ये सोमवार ८ ऑक्टोबर
२०३० मध्ये शनिवार २८ सप्टेंबर
२०३१ मध्ये शुक्रवार १७ ऑक्टोबर
२०३२ मध्ये मंगळवार ५ ऑक्टोबर
२०३३ मध्ये शनिवार २४ सप्टेंबर
२०३४ मध्ये शनिवार १३ ऑक्टोबर
राज्यात नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो. भद्राकाली शक्तिपीठ, सप्तश्रृंगी मंदिर, मुंबा देवी मंदिर, यमई देवी मंदिर, तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काळू बाई मंदिर, आंबा देवी मंदिर, एकवीरा देवीचं मंदिर या मंदिरांना तुम्ही नवरात्रीत भेट देऊ शकता. येथे देवीच्या आगमनामुळे मोठी जत्रा भरते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.