Navratri 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

Navratri Shopping: नवरात्रीत काही वस्तू खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. देवीची मूर्ती, कामधेनू मूर्ती, झाडे आणि वाहन खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

Manasvi Choudhary

नवरात्री हा अत्यंत पवित्र सण मानला जातो. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीला देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्र हा सण केवळ धार्मिक सण नसून अध्यात्मिक आणि मानसिक प्रगतीसाठी चांगला आहे. नवरात्रोत्सवात काही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जाते ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते.

हिंदू धर्मातील हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. देवीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मी धन, समृद्धी आणि कल्याणाची देवी मानली जाते.

श्रृगांर

नवरात्रीमध्ये श्रृगांराला विशेष महत्व आहे. देवीला श्रृगांर प्रिय असल्याने नवरात्रीत श्रृगांर खरेदी करणं शुभ मानलं जाते. यामुळे घरात समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

देवीची मूर्ती

या पवित्र सणादरम्यान घरात देवतेची मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानलं जाते. देवीची मूर्ती घरी आणल्याने शुभ असते. यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

झाडे लावा

नवरात्री सणादरम्यान तुळशी, शमी, केळी ही झाडे लावणे अत्यंत शुभ असेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

कामधेनूची मूर्ती

नवरात्रीत कामधेनूची मूर्ती घरी आणल्याने धन आणि आरोग्य दोन्ही प्राप्त होतात घरी कामधेनूची पूजा केल्याने आर्थिक अडचण दूर होते.

नवीन वाहन खरेदी करा

नवरात्रीत नवीन वाहन खरेदी करणे फायदेशीर असते. विशेषत: शनिवारी वाहन खरेदी केल्याने फायदेशीर असते.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

Success Story: जिद्द! एकदा नव्हे तर ६ वेळा MPSC क्रॅक; नांदेडचा लेक झाला क्लास १ ऑफिसर; ओमकेश जाधव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT