Navratri Fast Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Fast : मधुमेहींनो, यंदा नवरात्री उपवास करताय ? अशी घ्या आरोग्याची काळजी!

नवरात्रीच्या नऊ दिवस साबुदाणा खिचडी, फ्रूट चाट, खीर ते कुट्टू की पूरी व आलू कढी यांसह तोंडाला पाणी आणणारे अनेक स्‍वादिष्‍ट पदार्थांचे सेवन केले जाते.

कोमल दामुद्रे

Navratri Fast : अवघ्या काही दिवसात नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे व्रत व पूजा केली जाते. तसेच अनेक जण उपवास देखील करतात. या सणादरम्‍यान मेजवानीचा आस्‍वाद घेण्‍यासोबत उपवास देखील केला जातो. या शुभ सणाच्या नऊ रात्री भारतीय (India) लोक उपवास करतात.

साबुदाणा खिचडी, फ्रूट चाट, खीर ते कुट्टू की पूरी व आलू कढी यांसह तोंडाला पाणी आणणारे अनेक स्‍वादिष्‍ट पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु, हा उपवास करताना अनेकांना अनेक आजार जडले जातात. दिवसभर काही न खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा, पचनसंस्थेचा त्रास जडतो. या उपवासात शरीर डिटॉक्सिफाय होण्‍यास मदत होते. पण सलग ९ ते १० दिवस उपवास व कमी प्रमाणात आहार सेवन केल्‍याने व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यावर परिणाम होऊ शकतो.

कोणताही आजार असणारे किंवा विशेषत: मधुमेह (Diabetes) असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात.

इंदोर येथील टोटल डायबिटीस हार्मोन इन्स्टिट्यूटचे एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. सुनिल एम. जैन म्‍हणाले,नवरात्री उपवासादरम्‍यान खाण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल, उपवासाचे स्‍वरूप आणि सेवन न करण्‍यास सांगण्‍यात आलेले खाद्यपदार्थ सेवन करण्याच्या कारणामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे.

मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी दररोज काही तासानंतर खाणे गरजेचे आहे. दिवसभरात काही वेळा रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे.

मधुमेहांनी सण समारंभ साजरा करताना आरोग्याची काळजी कशी घ्याल हे जाणून घेऊया.

१. बदलेल्या आहारामुळे रक्तातील ग्‍लुकोजची पातळी कमी-जास्‍त होण्याची शक्यता असते. त्यासाठी उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यामुळे आपल्याला ग्लुकोजच्या चढ-उतारांचे नियमन कळेल.

२. उपवास करताना व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि फायबर समृध्द अन्नपदार्थांचे सेवन करू शकता, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

३. भाजलेले मखना, नट आणि भोपळ्याच्या कटलेटचे सेवन उपवासाच्या वेळी चांगले स्नॅक असण्‍यासोबत प्रथिनांची आवश्यकता देखील पूर्ण करतात. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी आणि फायबर-समृद्ध फळे जसे संत्री आणि किवी सेवनासाठी चांगली आहेत. ते शरीरातील इन्सुलिन चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करतात.

४. उपवास करताना रक्तातील ग्लुकोजची पातळी कधी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घरामध्‍ये ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टिम ठेवल्याने तुम्हाला तुमची ग्लुकोजची पातळी वेळोवेळी तपासण्‍यास मदत होईल.

५. मधुमेह असलेल्यांसाठी उपवासादरम्यान डिहायड्रेशन त्रासदायक आहे. उपवास करताना किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मीठ नसलेले ताक आणि लिंबूपाणी, ग्रीन टी, पुदिन्याचे पाणी, वेलची चहा, स्मूदी व नारळाचे पाणी यांसारखी कमी-कॅलरी पेये नवरात्रीदरम्यान डिहायड्रेशनचा सामना करण्यास मदत करू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT