Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशकात आरोग्य अग्निशामक विभागात ५८७ जागांसाठी भरती, लवकरच अर्ज प्रक्रिया सुरु

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Application Date : नाशिक महापालिकेत आरोग्य अग्निशमन विभागात ५८७ जागांसाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

कोमल दामुद्रे

Nashik Municipal Corporation Recruitment 2023:

आरोग्य विभागात काम करु पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. नाशिक महापालिकेत आरोग्य अग्निशमन विभागात ५८७ जागांसाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही भरती प्रक्रिया दिवाळीनंतर सुरु होईल.

या संदर्भातील परीक्षेचा प्रस्ताव हा प्रशासनाने आयुक्तांकडे पाठवला आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेत पाठवला जाणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वीच महापालिकेत भरतीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असे म्हटले जात आहे.

नाशिक महापालिकेत मागील २४ वर्षात कोणतीही भरती प्रक्रिया (Process) राबवली गेली नव्हती. सध्या अडीच हजार पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिका (Mahapalika) यंत्रणेवर ताण पडत आहे.

यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अग्निशमन, आरोग्य आणि वैद्यकीय विभासाठी ६७१ पदांना भरतीसाठी मंजुरी दिली होती. सध्या ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येत असून टीसीएस कंपनीत भरती (Recruitment) सुरु होऊ शकते.

यामध्ये आरोग्य आणि अग्निशामक विभागातील पदांसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. टीसीएस कंपनी परीक्षा घेत असली तरी त्याचे स्वरुप महापालिका ठरवेल. यामध्ये वैद्यकीय, अग्निशामक आणि घनकचरा विभागाकडून परीक्षेचे स्वरुप मागवण्यात आले. अग्निशामक विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ पदांच्या भरतीसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे असे पालिकेने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT