Narcissistic Personality Disorder SAAM TV
लाईफस्टाईल

Narcissistic Personality Disorder : नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डर म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Health Care Tips : आपल्या चांगल्या आरोग्यासाठी नार्सिसिस्ट माणसांपासून कायम दूर रहा. तुमच्या आजूबाजूची नार्सिसिस्ट माणसे कशी ओळखाल? यांची नेमकी लक्षणे काय जाणून घ्या.

Mruga Vartak

नॅर्सिसिस्ट माणसं कोण हे ठरवण्याआधी आपण याच्या मराठीतील नावाचा विचार करू. मराठीत नॅर्सिसिस्टसाठी आत्ममुग्ध हा प्रचलित प्रतिशब्द असला तरीही, आत्मपूजक हा त्यासाठी चपखल शब्द ठरतो. बरेचदा नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डरला मानसिक आजार म्हणून समजले जाते. परंतु, हा फक्त एक विकार आहे. विकार आणि आजार यात मोठा फरक असतो.

नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डर (NPD) असणारी अनेक माणसे आपल्या सभोवताली असतात. त्यांच्या सतत सहवासाने आपल्या मनावर परिणाम होतो. अशावेळी अशा माणसांना त्वरित ओळखून त्यांच्यापासून ४ हात लांब रहाणेच योग्य.पण, त्यासाठी ही माणसे कशी ओळखावीत? हे जाणून घेऊयात.

नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डरची लक्षणे

सहानुभूती मिळवणे, हक्काचा अभाव ही या व्यक्तींची ठळक वैशिष्टे आहेत. हे लोक इतर लोकांकडून सतत प्रशंसा, कौतुकाची अपेक्षा करतात. इतर लोकांबद्दल समानुभूती मात्र त्यांना कधीच वाटत नाही. आपण स्वतः कोणीतरी जगावेगळं आहोत असा त्यांचा ठाम समज असतो. लोकांकडून अतिविशेष वर्तुणुकीची अपेक्षा मात्र त्यांची नेहमी असते. रागावर नियंत्रण नाही आणि वृत्ती तर अतिशय संतापी. हे लोक सतत स्वतःबद्दल बोलत असतात. बोलण्यात उद्धटपणा, उर्मटपणा असतो. त्यांचा घमेंडखोर स्वभाव, मग्रूरीपणा आणि अहंकार लगेच नजरेत भरेल असा असतो. दिसायला मात्र ही माणसे अतिशय मोहक आणि आकर्षक असतात.

हा विकार माणसाला का जडतो?

मजेची गोष्ट तर इथे आहे. ही माणसे मुळातून वाईट नसतात. बाळपणी न्यूनगंडाने ग्रासलेली माणसे पुढे जाउन नार्सिसिस्ट होण्याची शक्यता जास्त असते. अनेक आघात सहन केलेले, सतत दुर्लक्षित राहीलेले मुले पुढे जाउन नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डरला शिकार होतात.

नार्सिसिस्ट विकाराने ग्रस्त असलेले बरे कसे होऊ शकतात?

तुम्हाला फार वाईट वाटेल परंतु या विकारावर उपाय नाही. ही माणसे संपूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत. कोणती सायकोथेरपी यांना सरळ मार्गावर आणू शकत नाहीत. यांच्यापासून संबंध/ संपर्क तोडणे, दूर जाणे हेच उपाय यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपयुक्त ठरतात.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT