nachni vs oats google
लाईफस्टाईल

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

Diabetes Diet: डायबेटीज रुग्णांसाठी नाचणी आणि ओट्स दोन्ही फायदेशीर असले तरी कोणता पर्याय योग्य? त्यांच्या पोषणमूल्यांसह फायदे जाणून घ्या आणि साखर नियंत्रणासाठी योग्य नाश्ता निवडा.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या जीवनशैलीमुळे सगळ्यांच्याच आहारात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. बऱ्याचदा काही डायबेटीजच्या रुग्णांना कामाच्या धावपळीतून खाण्यापिण्याचं पत्थ पाळायला वेळच मिळत नाही. पण नाश्त्याच्या बाबतीत अनेकांच्या मनात गोंधळ उडालेला असतो. कारण डायबेटीज म्हंटलं की, साखर पूर्णपणे बंद हाच सल्ला तुम्ही ऐकला असेल.

बऱ्याचदा लोक साखर बंद म्हणून नाचणी किंवा ओट्स खाणं पसंत करतात. पण या दोन पदार्थांचे फायदे आणि नुकसान दोन्हीही कोणालाच माहित नसतं. पुढील बातमीत आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

नाचणीचे फायदे

नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्याने पचनक्रिया सुधारते आणि तुमच्या रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते. इतर धान्यांच्या तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स नाचणीत असतं. कॅल्शियम, लोहाचे प्रमाणही यामध्ये जास्त असते. नाचणी खाल्यावर तुम्हाला जास्त भूकही लागत नाही. तर जेवणांनतर किंवा नाश्त्यानंतर रक्तातली साखरेची पातळी याने कमी होते. म्हणूनच तुम्ही नाचणीचं सेवन सकाळच्या नाश्त्यात केलं पाहिजे. त्यात तुम्ही नाचणीची लापशी, इडली किंवा उपमा हा नाश्ता सुद्धा बनवू शकता.

ओट्सचे फायदे

ओट्स हे नाश्त्यासाठी अनेकजण खातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात Soluble Fiber चा समावेश असतो. याने साखर सहजपणे नियंत्रणात ठेवता येते. यात मॅग्नेशियम असतं. त्यामुळे इन्सुलिनच्या कार्यासाठी याचा फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबेटीजमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. म्हणूनच आपण आपल्या आहारात ओट्सचा समावेश करणं गरजेचं आहे. यानेही तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

ओट्स की नाचणी काय योग्य?

तज्ज्ञांच्या मते ओट्स आणि नाचणी दोन्ही नाश्त्यात खाणं योग्य आहे. पण त्याआधी तुम्ही तुमच्या आहारात ४ दिवस नाचणी आणि ४ दिवस ओट्स खाऊन पाहा. तुम्हाला ज्याने जास्त फरक पडेल ते पदार्थ खाणं तुम्ही पसंत करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

SCROLL FOR NEXT