Myeloma Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Myeloma Disease : 'ही' सांधेदुखी नाहीतर आहे 'सायलेंट आजार' ! यामुळे महिलांची हाडे होतात ठिसूळ

Myeloma Symptoms : स्विंडन येथील एका 53 वर्षाची महिला अनेक महिन्यांपासून सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त होती.

कोमल दामुद्रे

Myeloma Disease : महिलांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. याला ओस्टिओपोरोसिस आजार असे म्हणतात हा विशेषत महिलांमध्ये आढळतो, या आजारांमध्ये हाडे कमकुवत होण्याच्या समस्या हळूहळू तीव्र होतात.

तसेच स्विंडन येथील एका 53 वर्षाची महिला अनेक महिन्यांपासून सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त होती. ही किरकोळ समस्या भविष्यात गंभीर समस्या बनू शकते हे तिच्या लक्षात आले नाही.

महिला डॉक्टरांकडे गेल्यास, डॉक्टरांनी महिलेला चेक करून सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही ही केवळ वृद्धत्वाची लक्षणे आहेत. तरीही दोन वर्षांनंतर महिलेला कॉस्टोकॉन्ड्रायटिस असल्याचे समोर आले, ज्यामुळे छाती आणि बरगड्यांना सूज येते.

कॉस्टोकॉन्ड्रायटिस असल्याचे समजल्यास महिलेला आवश्यक औषधे दिली गेली, मात्र औषधे देऊनही महिलेची प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे पुन्हा डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी केली. तर रिपोर्टनुसार महिलेला मायलोमा कर्करोग झाल्याचे उघडिकस आले. त्यासोबतच एक्यूट किडनी फेल झाल्याचेही आढळून आले.

1. मायलोमा म्हणजे काय?

रक्तातील कर्करोगाचा (Cancer) तिसरा सर्वात सामान्य प्रकार मायलोमा आहे. हा आजार शरीरातील प्लाझ्मा पेशींवर परिणाम करतो. मायलोमा हाडे, किडनी, लाल रक्तपेशींची संख्या आणि शरीरातील रोगाशी लढण्याची क्षमता खराब करते. अनेकदा लोक या लक्षणांना किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. कारण शरीरातील समस्या वाढत्या वयामुळे उद्भवू शकतात असे लोकांना वाटते. परंतु मायलोमा 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयांच्या लोकांना प्रभावित करतो. तसेच अनेक वेळा हा आजार (Disease) तरुणांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. मायलोमा आजार औषधांनी नियंत्रणात ठेवता येतो.

2. मायलोमाची लक्षणे (Symptoms)

  • हाडे दुखणे

  • अशक्तपणा

  • किडनीसंबधित समस्या

  • रक्त घट्ट होणे

  • असामान्य रक्तस्त्राव

  • रक्तातील कॅल्शियम लेव्हल वाढणे

  • हाडे सहजपणे फ्रॅक्चर होतात

  • शरीर सुन्न पडणे

  • शरीरात काटे येणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT